गोकूळ आवारे महापौर केसरी
By Admin | Updated: July 8, 2014 01:47 IST2014-07-08T01:47:20+5:302014-07-08T01:47:20+5:30
बीड जिल्हय़ाच्या गोकूळ आवारे याने एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या अतुल पाटीलला सहज चीतपट करताना 26व्या अखिल मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत बाजी मारली.

गोकूळ आवारे महापौर केसरी
मुंबई: बीड जिल्हय़ाच्या गोकूळ आवारे याने एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पुण्याच्या अतुल पाटीलला सहज चीतपट करताना 26व्या अखिल मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेत बाजी मारली.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आवारे याने निर्विवाद वर्चस्व राखले. संपूर्ण स्पर्धेत चमकदार खेळ करणारा पाटीलकडे देखील संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. मात्र अनुभवी गोकूळ आवारेने मोक्याच्या वेळी आपला दर्जा सिद्ध करताना 11-5 असा तब्बल 6 गुणांनी लोळवत महापौर केसरीचा मान मिळवत रोख 1 लाख रुपये व विजेतेपदाच्या चांदीची गदा देखील पटकावली.
दुस:या बाजूला झालेल्या कुमार गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या सागर लोखंडेने एकहाती वर्चस्व राखताना यजमान मुंबईच्या राहुल यादव याचा 9-क् असा चुराडा करीत कुमार केसरीचा मान मिळवत रोख 25 हजार रुपये व चांदीची गदा मिळवली. जागतिक विजेता असलेला मुंबईचा पैलवान संदीप यादव याने आपला उच्च दर्जा सिद्ध करताना पुण्याच्या कसलेल्या कोळेकर याला अवघ्या एका मिनिटामध्ये लोळवताना आपण जागतिक विजेते असल्याचे सिद्ध केले. त्याचप्रमाणो जागतिक विजेता राहुल आवारे याने देखील आपली विजयी परंपरा कायम ठेवताना पुण्याच्या विशाल मानेला 1क्-क् असे सहज लोळवले.
महिला गटातील चमकदार लढतीमध्ये थायलंड येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या कौसल्या वाघ हिने आपल्या लौकिकानुसार खेळताना रायगडच्या प्रियंका सणस हिला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करीत विजय मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी)