शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आगामी आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याचे ध्येय - राही सरनोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 02:33 IST

२०२० च्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे राहीने यावेळी सांगितले.

पुणे  - शालेय जीवनात केवळ २५ गुणांच्या उद्देशाने खेळात सहभागी होऊ नका. खेळ नि:स्वार्थ वृत्तीने खेळा. कष्ट करण्याची तयारी ठेवा. यश आपोआप तुमच्या पायावर लोळण घेईल, असा सल्ला आशियाडमध्ये नेमबाजीत सुवर्णवेध घेणारी महाराष्ट्रकन्या नेमबाज राही सरनोबत हिने शनिवारी युवा खेळाडूंना दिला. तसेच २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे राहीने यावेळी सांगितले.जकार्ता आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्याचा राहीचा बालगंधर्व रंगमंदिर येथे सत्कार करण्यात आला. कर्मभूमीतील या सत्कारामुळे ती भारावली होती. युवा खेळाडूृंशी संवाद साधताना ती म्हणाली, दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड द्या. महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये देशाचा तिरंगा फडकताना बघायचे ध्येय उराशी बाळगा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. स्वार्थासाठी खेळाची निवड केली तर क्रीडाक्षेत्रात कारकीर्द घडणार नाही, हे लक्षात ठेवा.यावेळी महापौर मुक्ता टिळक, आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, चित्रपट दिग्दर्शिका समृद्धी जाधव, विधान परिषद सचिव उत्तमसिंग चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. विठ्ठल जाधव, मोहन राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान उपस्थित होते. शिरीन सय्यद हिने सूत्रसंचालन केले.कर्मभूमीत होणारे स्वागत स्पेशलमाझ्या कारकिर्दीची जडणघडण पुण्यातच झाली. जन्मभूमी कोल्हापूर असली तरी कर्मभूमी पुणे होय. कर्मभूमीतील हा सत्कार माझ्यासाठी स्पेशल आहे. यामुळे मी भारावून गेले आहे, अशा शब्दात राहीने पुण्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी राहीचे वडील जीवन सरनोबत व आई प्रभा हे देखील उपस्थित होते. २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे राहीने यावेळी सांगितले.

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबतnewsबातम्या