शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

वैभवीचा झंझावाती खेळ

By admin | Updated: January 28, 2015 04:42 IST

बिगरमानांकित गुजरातच्या वैभवी त्रिवेदीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात आठव्या मानांकित दिल्लीच्या शहनाज सिंग हिचा पराभव

मुंबई : बिगरमानांकित गुजरातच्या वैभवी त्रिवेदीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात आठव्या मानांकित दिल्लीच्या शहनाज सिंग हिचा पराभव करून अखिल भारतीय महिला टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या आस्था दार्गुडे हिला बिगरमानांकित आंध्र प्रदेशच्या तेराथा इस्का हिच्याकडून पराभव पत्करावा लागला.पाच महिने दुखापतीमुळे खेळापासून दूर असलेल्या वैभवीने दमदार कमबॅक केले. तिने आक्रमक खेळ करताना ही लढत ७-६ (७-३), ४-६, ७-६ (७-४) अशी जिंकली. पहिल्याच सेटमध्ये वैभवी आणि शहनाज यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. टाय ब्रेकरमध्ये रंगलेल्या या सेटमध्ये वैभवीने बाजी मारली. दुसरा सेट मात्र शहनाजने हिरावून घेत सामना १-१ असा बरोबरीत आणला. निर्णायक सेटमध्ये चुरस आणखीनच रडली आणि वैभवीने अप्रतिम खेळ करून विजय निश्चित केला. इतर लढतीत अव्वल मानांकित गुजरातच्या ऐटी महेता हिने एकही गेम न गमावता दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. गतविजेत्या आणि दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या हिमानी मोर, तामिळनाडूची एम़ आर्थी, आंध्र प्रदेशच्या अक्षरा इस्का, दिल्लीच्या मान्या नागपाल आणि कर्नाटकच्या प्रीती उज्जीनी यांनी आगेकूच केली. (क्रीडा प्रतिनिधी)