जर्मनीला अल्जिरियाचे ‘चॅलेंज’
By Admin | Updated: June 30, 2014 01:27 IST2014-06-30T01:27:43+5:302014-06-30T01:27:43+5:30
दोन्ही संघ विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असतील़ मात्र, फॉरवर्ड लुकास पोडोल्स्की दुखापतीमुळे बाहेर झाल्यामुळे जर्मन संघ अडचणीत सापडला आह़े

जर्मनीला अल्जिरियाचे ‘चॅलेंज’
>पाटो-एलग्रे : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत संघाविरुद्ध 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागणा:या जर्मनीसमोर उप उपांत्यपूर्व फेरीत अल्जीरियाचे चॅलेंज राहील़ दोन्ही संघ विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असतील़ मात्र, फॉरवर्ड लुकास पोडोल्स्की दुखापतीमुळे बाहेर झाल्यामुळे जर्मन संघ अडचणीत सापडला आह़े
स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणा:या जर्मनीविरुद्धच्या लढतीत अल्जीरियाला कमी लेखणो योग्य ठरणार नाही़ कारण स्पर्धेच्या साखळी लढतीत जर्मनीला दुबळ्या घानाविरुद्ध 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होत़े गत तीन दशकांतील जर्मनीची ही सर्वात निराशाजनक कामगिरी होती़ त्यामुळे अल्जीरियाविरुद्धच्या लढतीत फ्रान्सला सावध राहावे लागणार आह़े
सन 1954, 1974 आणि 199क् मध्ये विजेतेदाचा ताज आपल्या नावे करणा:या जर्मनीने वर्ल्डकपच्या साखळी लढतीत पोतरुगालवर 4-क् असा विजय मिळविला होता, तर दुस:या लढतीत त्यांनी अमेरिकेवर 1-क् ने धूळ चारली होती़
मात्र, घाना विरुद्धच्या तिस:या लढतीत त्यांना 2-2 असे बरोबरीवर समाधान मानावे लागले होत़े त्यामुळे जर्मन संघाला जगभरातून टीकेला सामोरे जावे लागले होत़े जर्मन संघाला स्पर्धेच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आह़े इतिहास अल्जीरियाच्या बाजूने असल्यामुळे जर्मनीला सावध राहावे लागेल़
यापूर्वी हे संघ दोनवेळा आमने सामने आले आहेत़ त्यात दोन्ही वेळा अल्जीरियाने बाजी मारली होती़ त्यामुळे वर्ल्डकपमधील उप उपांत्यपूर्व फेरीचा सामना एकतर्फी होईल, अशी शक्यता नाही़ (वृत्तसंस्था)
या लढतीत घानाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणा:या जर्मनीच्या मिरसोलाव्ह क्लोस याच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल, तर स्पर्धेत आतार्पयत चार गोल नोंदविणारा थॉमस म्युलर बिएरो रिओ स्टेडियमवर आकर्षणाचा केंद्रबिंदू राहील़
दुसरीकडे वर्ल्डकपमधील आपल्या कामगिरीमुळे अल्जीरिया संघ चर्चेत आह़े चौथा वर्ल्डकप खेळणारा हा संघ पहिल्यांदाच स्पर्धेच्या दुस:या फेरीत पोहोचला आह़े त्यामुळे हा संघ कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असेल़ दक्षिण कोरियाविरुद्धच्या साखळी लढतीत अल्जीरियाने तब्बल चार गोल नोंदविले होत़े अशीच कामगिरी पुढेही सुरू ठेवण्यासाठी संघ आतुर असेल़ (वृत्तसंस्था)
जर्मनीचा लुकास पोडोल्स्की बाहेर?
पोटरे : एलेग्रे : जर्मनीचा फॉरवर्ड लुकास पोडोल्स्की दुखापतीमुळे अल्जेरियाविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीतून बाहेर झाला आह़े त्यामुळे जर्मनीचा संघ अडचणीत सापडला आह़े तिसरा वर्ल्डकप खेळणारा 29 वर्षीय लुकास अमेरिकेविरुद्धच्या साखळी फेरीतील लढतीत दुखापतग्रस्त झाला होता़ या लढतीत जर्मनीने अमेरिकेवर 1-क् असा विजय मिळविला होता़ लुकास बाहेर झाल्यानंतर मारिओ गोएट्जेला जर्मन संघात संधी मिळू शकत़े
हेड टू हेड..
जर्मनी आणि अल्जेरिया या दोन्ही संघांत आतार्पयत केवळ दोन लढती झाल्या. या दोन्ही सामन्यांत अल्जेरियाने बाजी मारली आहे. त्यामुळे जर्मनीपुढे अल्जेरियाचे आव्हान असेल. उभय संघांत झालेल्या या लढतीत अल्जेरियाने सर्वाधिक 4 गोल नोंदवले आहेत. जर्मनीला मात्र एकच गोल नोंदवता आला.