जर्मनी प्रबळ दावेदार : भूतिया
By Admin | Updated: June 25, 2014 02:22 IST2014-06-25T02:22:16+5:302014-06-25T02:22:16+5:30
विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाचा जर्मनीचा संघ प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बाईचुंग भूतियाने व्यक्त केले आह़े

जर्मनी प्रबळ दावेदार : भूतिया
>नवी दिल्ली : उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या बळावर या वर्षीच्या विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाचा जर्मनीचा संघ प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बाईचुंग भूतियाने व्यक्त केले आह़े स्पर्धेच्या सुरुवातीला ब्राझील, स्पेन, अर्जेटिना आणि जर्मनीचे संघ जेतेपदाचे दावेदार वाटत होत़े परंतु स्पर्धेचा कालावधी जसजसा पुढे जात आहे तसा जर्मनीचा संघ चांगल्या
खेळाचे प्रदर्शन करत आह़े आजर्पयतच्या सामन्यातील कामगिरीचा विचार करता बेल्जियमनेदेखील समाधानकारक कामगिरीची नोंद केली आह़े त्यामुळे जर्मनीसह बेल्जियमदेखील जेतेपदाच्या शर्यतीत आह़े