घानाला नॉकआऊट करणार जर्मनी?

By Admin | Updated: June 21, 2014 00:42 IST2014-06-21T00:42:37+5:302014-06-21T00:42:37+5:30

पोतरुगालसारख्या मजबूत संघाला 4-0 अशी धूळ चारणारा जर्मनी शनिवारी जी गटातील पुढील लढतीत घानाला नॉकआऊट करून अंतिम 16 जणांत प्रवेश निश्चित करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Germany to knock out Ghana? | घानाला नॉकआऊट करणार जर्मनी?

घानाला नॉकआऊट करणार जर्मनी?

>सांता आन्द्रे : पोतरुगालसारख्या मजबूत संघाला 4-0 अशी धूळ चारणारा जर्मनी शनिवारी  जी गटातील पुढील लढतीत घानाला नॉकआऊट करून अंतिम 16 जणांत प्रवेश निश्चित करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
या सामन्यात जर्मनीला घानाच्या केव्हिन प्रिन्स बोटेंग याला देखील जोरदार प्रत्युत्तर द्यायचे आहे. जर्मनीत जन्मलेल्या बोटेंगने जोआकिम लोऊच्या जर्मन संघावर आरोप केला होता. त्याने जर्मन संघाकडे कठीण सामन्यात संघाला संकटाबाहेर काढणारा एकही खेळाडू नसल्याचा आरोप केला होता.  
जर्मनीला युरो 2012च्या उपांत्य फेरीत इटलीकडून पराभव पत्करावा लागला होता आणि गतवर्षी स्वीडनविरुद्ध त्यांचा सामना 4-4 असा बरोबरीत सुटला होता; परंतु या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीने पोतरुगालला 4-0 अशी धूळ चारताना वादळी सुरुवात केली आहे. घानाला सलामीच्या लढतीत अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला होता.  (वृत्तसंस्था)
 
पोतरुगालला 4-0 
गोलने सफाया केल्यामुळे 
आत्मविश्वास उंचावलेल्या जर्मनी संघाचे पारडे जड
जागतिक क्रमवारीत द्वितीय मानांकित जर्मनी 
आणि 37 व्या क्रमांकावर असणा:या घाना यांच्यात आतार्पयत झाले दोन सामने. त्यात  
एकुण आठ गोल्समध्ये जर्मनीने 7 तर घानाने फक्त एक गोल केला.
या दोन्ही सामन्यात जर्मनीने मारली बाजी

Web Title: Germany to knock out Ghana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.