शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सर्वसाधारण सभेचे स्थळ बदलले, आयओए कार्यकारी परिषदेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 4:18 AM

भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्याविरुद्ध पाऊल उचलताना कार्यकारी परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये त्यांच्या इच्छेविरुद्ध वार्षिक

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्याविरुद्ध पाऊल उचलताना कार्यकारी परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये त्यांच्या इच्छेविरुद्ध वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक (एजीएम) चेन्नईतून नवी दिल्लीमध्ये स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयासह त्यांचा आणखी एक निर्णयही बदलण्यात आला.रामचंद्रन कार्यकारी परिषदेच्या मंगळवारी झालेल्या तातडीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले नव्हते. महासचिव राजीव मेहता यांनी आघाडीच्या २७ पैकी १९ सदस्यांच्या मागणीनंतर ही बैठक आयोजित केली होती. रामचंद्रन यांच्या अनुपस्थितीत वरिष्ठ उपाध्यक्ष वीरेंद्र नानावटी यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.कार्यकारी परिषदेचे २१ सदस्य या बैठकीत सहभागी झाले होते, तर उपाध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बैठकीत सहभागी होण्यास असमर्थता व्यक्त केली. कारण ते हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. रामचंद्रन यांनी यापूर्वीच कार्यकारी परिषदेची बैठक चेन्नईमध्ये ९ नोव्हेंबरला बोलविलेली आहे. त्यांनी आयओएच्या नव्या पदाधिकाºयांची निवड करण्यासाठी १४ डिसेंबरला चेन्नईमध्ये एजीएम बोलविलेली आहे. त्यात अध्यक्ष व महासचिव पदाचीही निवडणूक होणार आहे.मेहता म्हणाले, ‘आज घेण्यात आलेल्या निर्णयांना अध्यक्षांतर्फे चेन्नईमध्ये ९ नोव्हेंबरला बोलविण्यात आलेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात येईल.’परिषदेमध्ये रामचंद्रन यांना पाठिंबा देणाºया सदस्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १४ डिसेंबरला होणाºया एजीएमपूर्वी त्यांना पदावरून हटविल्या जाऊ शकते. आता ९ नोव्हेंबरला होणाºया बैठकीमध्ये आयओएतील सत्ता संघर्ष अनुभवाला मिळण्याची शक्यता आहे. कारण आज बैठकीमध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांनी यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. उपाध्यक्ष तरलोचन सिंग म्हणाले, ‘कार्यकारी परिषदेने १४ डिसेंबरला चेन्नईच्या ऐवजी दिल्लीमध्ये एजीएम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. एजीएमदरम्यान १४ डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोग व निवडणूक अधिकाºयाचे नाव निश्चित केले आहे.’सदस्यांच्या मागणीनंतर कार्यकारी परिषदेच्या बैठकीच्या आयोजनाच्या वैधतेबाबत विचारले असता तरलोचन म्हणाले,’ ही बैठक वैध आहे. कारण २७ पैकी १९ सदस्य बैठकीचे आयोजन करण्यास अनुकूल होते व मंगळवारी २१ सदस्य त्यात सहभागी झाले.’ बैठकीदरम्यान आंध्र प्रदेश आॅलिम्पिक संघटनेतील वाद मिटवण्यासाठी रामचंद्रन यांच्यातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या मध्यस्थांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला.