गेल, मॅक्युलमचा विक्रम मोडला कोहलीने
By Admin | Updated: March 31, 2016 21:05 IST2016-03-31T21:05:34+5:302016-03-31T21:05:34+5:30
टी २० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात नाबाद ८९ धावांची धडाकेबाज खेळी करत टी २० करीयर मधील आपले १६ वे अर्धशतक केले. या अर्धशतकाबरोबरच टी ट्वेण्टीमध्ये १६ अर्धशतकं ठोकणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे.

गेल, मॅक्युलमचा विक्रम मोडला कोहलीने
>नामदेव कुंभार
मुंबई, दि. ३१ - टी २० विश्वचषकातील उपांत्य सामन्यात नाबाद ८९ धावांची धडाकेबाज खेळी करत टी २० करीयर मधील आपले १६ वे अर्धशतक केले. या अर्धशतकाबरोबरच टी ट्वेण्टीमध्ये १६ अर्धशतकं ठोकणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या ब्रेण्डन मॅक्युलमचा १५ आणि विंडिजच्या ख्रिस गेलचीही १५ अर्धशतकांचा विक्रम मोडला आहे.
४३ सामन्यातील ४० डावात त्याने १६ अर्धशतके करण्याचा भीमपराक्रम केला आहे. यादरम्यान तो १२ वेळा नाबाद राहिला आहे. तर १७३ चौकार आणि ३२ षटकार मारले आहेत. ४३ सामन्यात ५५.४२च्या सरासरीने १६४१ धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्रईक रेट १३३ ऐवढा होता. नाबाद ९० त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे.