शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गावसकर यांचा अविस्मरणीय वाढदिवस!

By admin | Updated: July 12, 2014 00:53 IST

‘मेमसाब’ हे नॉटिंघमच्या हृदयस्थळी वसलेले इंडियन रेस्टॉरेंट! गुरुवारच्या सायंकाळी येथे ग्लॅमर आणि झगमगाट यांचा संगम पहायला मिळाला.

अजय नायडू
‘मेमसाब’ हे नॉटिंघमच्या हृदयस्थळी वसलेले इंडियन रेस्टॉरेंट! गुरुवारच्या सायंकाळी येथे ग्लॅमर आणि झगमगाट यांचा संगम पहायला मिळाला. महान कसोटीपटू सुनील गावसकर यांच्या 65 व्या वाढदिवसाचा कार्यक्रम याच ठिकाणी झाला. याप्रसंगी जे महान खेळाडू उपस्थित होते त्यात सर ज्योफ बायकॉट, इयान बोथम, कपिलदेव, वासिम आक्रम, मार्क निकोलस आणि माइक  प्रॉक्टर आदी दिग्गजांचा समावेश होता.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सनी म्हणाले, ‘मी येथे कसोटी सामने खेळलो नाही, पण नॉटिंघमशी माङया अनेक आठवणी जुळल्या आहेत. येथे माङो काही चांगले मित्र आहेत.  लंडन नेहमी व्यस्त.. व्यस्त आणि व्यस्त असते पण येथे कसे शांत आणि सुखावह वाटते. हे मजेदार शहर आहे. ट्रेंटब्रीज मैदानाशेजारीच नदी आहे.’
जुन्या प्रतिस्पध्र्यासोबत ही रम्य सायंकाळ  आनंद देणारी आहे. आता हे सर्वजण माङो मित्र बनले आहेत. मला वाटते हा विशेष सोहळा आहे. खेळाच्या मैदानावर आपण हाडवैरी असतो, पण खेळ संपताच मित्र बनतो हीच या खेळाचे सौंदर्य वाढविणारी बाब ठरावी.’ नॉटिंघमच्या पहिल्या कसोटीबद्दल सनीचे मत असे की, ‘ट्रेंटब्रीजची खेळपट्टी गोलंदाजांसाठी निर्जीव आहे. या खेळपट्टीवर गडी बाद करणो त्यांच्यासाठी तारेवरची कसरत ठरावी. ’ 
या पार्टीत आपला मुलगा तैमूर 
याच्यासोबत सहभागी झालेला वासिम आक्रम म्हणाला, ‘क्रिकेटशिवाय गेल्या काही दिवसांत येथे सर्व काही सुरळीत पार पडले. भेट देण्यासाठी ट्रेंटब्रीज ही परफेक्ट जागा आहे, पण ही टिपिकल ट्रेंटब्रीज विकेट नाही. काहीवेळा ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी पूरक असते तर काही वेळा निर्जीव ठरते. क्रिकेटचा हा भाग आहे.’ मेमसाब रेस्टॉरेंटच्या मालकीण अमिता साहनी म्हणाल्या, ‘आमच्याकडे दररोज खेळाडू येत असतात. सामना सुरू होण्याच्या तीन दिवस आधी  धोनी,  विजय आणि इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन हे येऊन गेले.’