गौतम गंभीर आणि मनोज तिवारी यांच्यात खडाजंगी
By Admin | Updated: October 24, 2015 20:35 IST2015-10-24T20:23:09+5:302015-10-24T20:35:08+5:30
येथील फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेल्या दिल्ली आणि बंगाल यांच्यातील रणजी सामन्यादरम्यान दिल्लीचा गौतम गंभीर आणि बंगालचा मनोज

गौतम गंभीर आणि मनोज तिवारी यांच्यात खडाजंगी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - येथील फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेल्या दिल्ली आणि बंगाल यांच्यातील रणजी सामन्यादरम्यान दिल्लीचा गौतम गंभीर आणि बंगालचा मनोज तिवारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
मिऴालेल्या माहितीनुसार, सामन्याच्यावेळी फलंदाजी करताना मनोज तिवारीने गोलंदाजाला इशारा करत थांबविले आणि ड्रेसिंग रुममधून हेल्मेट आणण्याचे कारण दिले. यावर गोलंदाजाने जानूनबूजून सामन्याची वेळ घालविण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप केला. यावेळी कप्तान गौतम गंभीरने हस्तक्षेप केला आणि गंभीर आणि मनोज तिवारी यांच्यात वाद सुरु झाला. दोघेही एकमेकांवर धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान, पंच श्रीनाथ यांनी मध्यस्थी करत दोघांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना गौतम गंभीरने धक्का देत दूर केलं. तसेच, गौतम गंभीरने थेट मनोज तिवारीला संध्याकाळी भेट, मी तुला मारतो अशी धमकी दिली. तर, त्याला मनोज तिवारीने संध्याकाळी कशाला आत्ताच बाहेर चल, असं प्रत्तुत्तर दिलं.
दरम्यान, नियमानुसार क्रिकेटच्या सामन्यावेळी पंचांना हात सुद्धा लावणे गुन्हा असून यासंबंधी खेळाडूंवर कारवाई होऊ शकते. त्यामुऴे आता मनोज तिवारी आणि गौतम गंभीर यांच्यावर कारवाई होऊ शकते.