गंभीर-लिन जोडीने छाप सोडली

By Admin | Updated: April 8, 2017 23:46 IST2017-04-08T23:46:13+5:302017-04-08T23:46:13+5:30

कोलकाता संघाने गेल्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थान भूषविणाऱ्या गुजरात संघाचा १० गडी राखून पराभव करीत आयपीएलच्या दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने शानदार

Gambhir-Lin added the impression | गंभीर-लिन जोडीने छाप सोडली

गंभीर-लिन जोडीने छाप सोडली

- सुनील गावसकर लिहितात...

कोलकाता संघाने गेल्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थान भूषविणाऱ्या गुजरात संघाचा १० गडी राखून पराभव करीत आयपीएलच्या दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने शानदार सुरुवात केली. टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने १०० धावा फटकावताना विकेट न गमावणे, असे क्वचितच घडते आणि गंभीर-लिन जोडीने १८४ धावांचे मोठे लक्ष्य विकेट न गमविता पूर्ण केले. त्यामुळे लायन्सच्या कर्णधाराला अपल्या गोलंदाजांच्या क्षमतेवर शंका व्यक्त करण्यास बाध्य केले. रैनाने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीत फॉकनरचा अपवाद वगळता सर्व भारतीय गोलंदाजांचा संघात समावेश केला. आॅस्ट्रेलियन गोलंदाजाच्याउपस्थितीचा गंभीर-लिन जोडीच्या फलंदाजीवर काही प्रभाव पडला नसता, असे कर्णधाराला वाटू शकते. दरम्यान, अन्य फ्रे न्चायजीने वगळलेल्या खेळाडूंना करारबद्ध करणे जोखमीचे ठरू शकते.
फ्रे न्चायजी पैसा वाचविण्यासाठी वगळण्यात आलेल्या खेळाडूंना करारबद्ध करतात. या अती झटपट क्रिकेट स्पर्धेत गंभीरची शैली पूर्णपणे वेगळी असते. त्याची पायांची हालचाल वेगळीच भासते. गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटताक्षणीच गंभीरने आपला निर्धार पक्का केलेला असतो. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याची आक्रमकता पाहण्याजोगी असते. धावा पळताना त्याची चपळाई एखाद्या किशोरवयीन खेळाडूप्रमाणे असते. लिनने आक्रमक खेळी करताना आक्रमक फलंदाज म्हणून छाप सोडली आहे. राजकोटमध्ये त्याने आठ षटकार लगावले.
कोलकाताची ही आक्रमक जोडी मुंबई संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. त्याचसोबत मुंबई संघाला पीयूष चावला व कुलदीप यादव यांच्याविरुद्धही सावधगिरी बाळगावी लागेल. चावलाच्या प्रत्येक सत्रातील कामगिरीचा आलेख उंचावणारा आहे. युवा कुलदीप निर्णायक क्षणी बळी घेण्यात यशस्वी ठरत आहे. मुंबई संघाला आपल्या गोलंदाजीवर लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: शेजारी पुणे संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत मुंबई संघाची गोलंदाजी साधारण होती. हरभजनला वगळण्याचा निर्णय धाडसी होता, पण भज्जीला यानंतरच्या लढतीत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून ते सिद्ध करावे लागेल. हरभजनसारख्या अनुभवी खेळाडूला केवळ प्रेम किंवा पैशासाठी विकत घेतले जात नाही. मुंबई संघाला त्याच्या लढवय्या खेळाची गरज आहे.
सनरायजर्स संघाची
सुरुवात चांगली झाली असून गुजरातविरुद्ध गतचॅम्पियन्स संघाचे पारडे वरचढ भासत आहे. दरम्यान, टी-२० मध्ये संघ व खेळाडूंच्या फॉर्मबाबत भाकीत वर्तविणे कठीण असते. कदाचित रैनाही हाच विचार करीत असेल.(पीएमजी)

Web Title: Gambhir-Lin added the impression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.