French Open Final: 12 वर्षीय मुलामुळे नोव्हाक जोकोव्हिचनं पटकावलं जेतेपद, म्हणूनच टेनिसपटूनं दिली अनमोल भेट, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 01:46 PM2021-06-14T13:46:40+5:302021-06-14T13:46:58+5:30

French Open: Who is this 12 year old boy, सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचनं ( Novak Djokovic) रविवारी फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद नावावर करताना ग्रँड स्लॅम जेतेपदाची संख्या 19 वर नेली.

French Open: Who is this 12 year old boy, why Novak Djokovic gifted him his racquet that won him French Open 2021?, Watch Video | French Open Final: 12 वर्षीय मुलामुळे नोव्हाक जोकोव्हिचनं पटकावलं जेतेपद, म्हणूनच टेनिसपटूनं दिली अनमोल भेट, Video

French Open Final: 12 वर्षीय मुलामुळे नोव्हाक जोकोव्हिचनं पटकावलं जेतेपद, म्हणूनच टेनिसपटूनं दिली अनमोल भेट, Video

Next

French Open Final: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचनं ( Novak Djokovic) रविवारी फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद नावावर करताना ग्रँड स्लॅम जेतेपदाची संख्या 19 वर नेली. 2019नंतर जोकोव्हिचनं फ्रेंच ओपन जिंकण्याचा पराक्रम केला. ओपन एरात ( Open Era) चारही ग्रॅंड स्लॅम स्पर्धा दोनवेळा जिंकणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला. अंतिम लढतीत नोव्हाकनं ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सीपासचा 6-7 ( 6/8), 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा पराभव केला. या विजयानंतर नोव्हाकनं विजेतेपदाचा रॅकेट एका 12 वर्षीय मुलाला भेट म्हणून दिला आणि त्यानंतर त्या मुलाच्या आनंदासमोर गगनही ठेंगणे वाटू लागले होते. सोशल मीडियावर सध्या नोव्हाकच्या या अनमोल भेट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ( Novak Djokovic said he gave away his racquet that won him the Roland Garros 2nd time to a 12-year-old boy)

French Open 2021 Final : सामन्याच्या पाच मिनिटांआधी कुटुंबातील व्यक्तीचं झालं निधन, तरीही तो कोर्टवर उतरला अन्...

कोण आहे हा मुलगा?
नोव्हाक जोकोव्हिच अंतिम सामन्यात 0-2 असा पिछाडीवर होता आणि त्यानंतर त्यानं जबरदस्त कमबॅक करून बाजी मारली. महान फलंदाज सचिन तेंडुलकरपासून ते अनेक दिग्गजांनी नोव्हाकच्या या कमबॅकचे भरभरून कौतुक केले. पण, नोव्हाकला हे जेतेपद त्या 12 वर्षीय मुलामुळे मिळाले आहे. नोव्हाकनं सामन्यानंतर स्वतः याबद्दल सांगितले.


नोव्हाक म्हणाला,''संपूर्ण सामन्यात त्याचा आवाज माझ्या कानावर पडत होता, जेव्हा मी दोन सेट गमावले, तेव्हा तो मला प्रोत्साहन देण्यासाठी अधिक जोरानं ओरडत होता. त्यानं मला काही टीप्सही दिल्या. सर्व्हिस कायम ठेव, बॅकहँड फटका मार, असे अनेक सल्ले तो मला देत होता. खरं तर तो मला प्रशिक्षणच देत होता. मला त्याचं हे प्रेम आवडलं. त्यामुळे सामन्यानंतर मी त्याला रॅकेट दिले.''

34 वर्षीय नोव्हाकनं यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. 
 

Web Title: French Open: Who is this 12 year old boy, why Novak Djokovic gifted him his racquet that won him French Open 2021?, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.