फ्रेंच ओपन : व्होज्नियाकीची कुज्नेत्सोव्हावर मात करत नदाल उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: June 5, 2017 03:56 IST2017-06-05T03:56:41+5:302017-06-05T03:56:41+5:30

नऊवेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या राफेल नदालने विक्रमी ११ व्यांदा फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली

French Open: Nadal tries to beat Wozniacki Kuznetsova in quarter-finals | फ्रेंच ओपन : व्होज्नियाकीची कुज्नेत्सोव्हावर मात करत नदाल उपांत्यपूर्व फेरीत

फ्रेंच ओपन : व्होज्नियाकीची कुज्नेत्सोव्हावर मात करत नदाल उपांत्यपूर्व फेरीत


पॅरिस : नऊ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या राफेल नदालने विक्रमी ११ व्यांदा फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे, तर कॅरोलिन व्होज्नियाकीने २००९ ची चॅम्पियन स्वेतलाना कुज्नेत्सोव्हाचा पराभव करीत अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळवले.
नदालने कामगिरीत सातत्य राखताना १७ व्या मानांकित स्पेनच्या रॉबर्टो बतिस्ता एगटचा ६-१, ६-२, ६-२ ने पराभव केला. या विजयासह नदालने ११ वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी साधली. १४ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या नदालने या स्पर्धेत अद्याप एकही सेट गमावलेला नाही. गेल्या दोन लढतींमध्ये त्याने केवळ सहा गेम गमावले आहेत.
गत चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचने स्पेनच्या अलबर्ट रामोस विनोलसचा पराभव केला, तर तो ११ व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरेल. जपानच्या केई निशिकोरीने दक्षिण कोरियाच्या हियोन चुंगचा ७-५, ६-४, ६-७, ०-६, ६-४ ने पराभव केला. आता त्याला फर्नांडो वर्डास्कोच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. महिला विभागात ११ व्या मानांकित डेन्मार्कच्या व्होज्नियाकीने कुज्नेत्सोव्हाचा ६-१, ४-६, ६-२ ने पराभव केला. आॅस्ट्रेलियाची सामंथा स्टोसूर लाटवियाच्या येलेना ओसोबत खेळणार आहे. दुसऱ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने जर्मनीच्या कारिना विथोप्टचा ७-५, ६-१ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)

Web Title: French Open: Nadal tries to beat Wozniacki Kuznetsova in quarter-finals