फ्रान्सची झुंज दुबळ्या नायजेरियाशी

By Admin | Updated: June 30, 2014 01:30 IST2014-06-30T01:30:16+5:302014-06-30T01:30:16+5:30

सोमवारी फ्रान्स व नायजेरिया एकमेकांशी झुंजतील़ नायजेरियाविरुद्धच्या लढतीत फ्रान्सची बाजू वरचढ मानली जात आह़े

France's defeat faltering against Nigerian | फ्रान्सची झुंज दुबळ्या नायजेरियाशी

फ्रान्सची झुंज दुबळ्या नायजेरियाशी

>ब्रासीलिया : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपउपांत्य फेरीत सोमवारी फ्रान्स व नायजेरिया एकमेकांशी झुंजतील़ नायजेरियाविरुद्धच्या लढतीत फ्रान्सची बाजू वरचढ मानली जात आह़े दुसरीकडे नायजेरिया पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असेल़ 
फुटबॉल वर्ल्डकपमध्ये फ्रान्स संघाने बाद फेरीत प्रवेश मिळविल्यानंतर कमीतकमी उपांत्य फेरी गाठली आह़े फ्रान्सने साखळी लढतीत होंडूरासवर 3-क् असा विजय मिळविला होता, तर दुस:या लढतीत त्यांनी स्वीत्ङरलडला 5-2 असा धडा शिकविला होता़ मात्र, इक्वाडोअरविरुद्धच्या तिस:या लढतीत त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले होत़े 1998 नंतर नायजेरियाचा हा पहिल्यांदाचा नॉकआऊट सामना असणार आह़े फ्रान्सविरुद्धच्या लढतीत विजय मिळविल्यास नायजेरिया संघ पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याची किमया साधेल़ ई गटात सात गुणांसह फ्रान्सने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले होत़े 
दुसरीकडे नायजेरिया संघ पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असेल़ त्यांनी यापूर्वी 1994 आणि 1998 मध्ये वर्ल्डकपच्या अंतिम 16 संघांत जागा मिळविली होती़ तेव्हा दोन्ही वेळा त्यांना युरोपीय संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता़  (वृत्तसंस्था)
  दरम्यान, नायजेरियाचा अंतिम 16 संघांत पोहोचण्याचा मार्ग सोपा नव्हता़ स्पर्धेपूर्वी खेळाडूंचे मानधन न मिळाल्यामुळे खेळाडूंनी वर्ल्डकपमध्ये खेळण्यास इन्कार केला होता; मात्र त्यानंतर या प्रकरणावर तोडगा काढण्यात आला होता़ नायजेरियाविरुद्धच्या लढतीत फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू करीम बेनजेमा हा कशी कामगिरी करतो यावर सर्वाची नजर राहील़ फ्रान्स संघातील फुटबॉलपटू एंटोनी ग्रिजमान म्हणाला, जागतिक सवरेत्कृष्ट खेळाडूंपैकी करीम एक आह़े खेळाडूंना त्याच्याकडून चांगला खेळ करण्याची प्रेरणा मिळत़े बेनजेमाने वल्र्डकपमध्ये आतार्पयत तीन गोल नोंदविले आहेत.
 
़़़अन् नायजेरिया 
फ्रान्सवर वरचढ ठरला
एफ गटात नायजेरिया संघ 4 गुणांसह दुस:या क्रमांकावर विराजमान होता़ फ्रान्स आणि नायजेरिया यांच्यातील लढत एकतर्फी होईल असे भाकीत अनेकांनी केले असले, तरी 2क्क्9 मध्ये नायजेरियाने फ्रान्सवर 1-क् असा विजय मिळविला होता हे विसरता येणार नाही़ विशेष म्हणजे नायजेरिया आणि फ्रान्स दोन्ही संघांतील हा पहिलाच आंतराष्ट्रीय सामना होता़ 
 
हेड टू हेड..
फ्रान्स आणि नायजेरिया यांच्यात आतार्पयत केवळ एकच सामना झाला. त्यामुळे एकमेकांविरुद्ध खेळण्याचा उभय संघांना फारसा अनुभव नाही. हा एकमेव सामना नायजेरियाने जिंकला आहे. उभय संघांत झालेल्या या लढतीत नायजेरियाने एकमेव गोल नोंदवला आहे. त्यामुळे विश्वचषकातील या लढतीत कोण बाजी मारेल, हे सांगणो अनिश्चिततेचे ठरेल.

Web Title: France's defeat faltering against Nigerian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.