सोलापूर ग्रामीण पोलीस क्रीडा स्पर्धेत चार संघ सहभागी

By Admin | Updated: August 21, 2014 22:10 IST2014-08-21T22:10:54+5:302014-08-21T22:10:54+5:30

सोलापूर: सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत चार संघ सहभागी होणार आहेत़ दि़ 22 ते 24 ऑगस्टदरम्यान पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील मैदानावर होणार्‍या या स्पर्धेत सोलापूर ग्रामीण विभाग, बार्शी, पंढरपूर व पोलीस मुख्यालय असे चार संघ सहभाग नोंदविणार असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी कळविले आह़े

Four teams participated in the Solapur rural police sports competition | सोलापूर ग्रामीण पोलीस क्रीडा स्पर्धेत चार संघ सहभागी

सोलापूर ग्रामीण पोलीस क्रीडा स्पर्धेत चार संघ सहभागी

लापूर: सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत चार संघ सहभागी होणार आहेत़ दि़ 22 ते 24 ऑगस्टदरम्यान पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील मैदानावर होणार्‍या या स्पर्धेत सोलापूर ग्रामीण विभाग, बार्शी, पंढरपूर व पोलीस मुख्यालय असे चार संघ सहभाग नोंदविणार असल्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी कळविले आह़े
या स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ सहभागी होणार असून, यामध्ये फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, हँडबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी व खो-खो अशा सांघिक स्पर्धा होणार आहेत़ तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये लांबउडी, उंचउडी, 100, 200, 400, 800 व 1500 मी़ धावणे स्पर्धेसह जलतरण स्पर्धेचाही समावेश आह़े
या स्पर्धेचे शुक्रवार, दि़ 22 ऑगस्ट रोजी उद्घाटन तर बक्षीस वितरण दि़ 24 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते होणार आह़े

Web Title: Four teams participated in the Solapur rural police sports competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.