फ्लेचर यांचे महत्त्व कमी झालेले नाही : शास्त्री
By Admin | Updated: August 22, 2014 01:11 IST2014-08-22T01:11:07+5:302014-08-22T01:11:07+5:30
निराशेच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा विजयी मार्गावर आणण्याची जबाबदारी नवनियुक्त संचालक रवी शास्त्रीवर आली आहे.

फ्लेचर यांचे महत्त्व कमी झालेले नाही : शास्त्री
लंडन : निराशेच्या गर्तेत सापडलेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा विजयी मार्गावर आणण्याची जबाबदारी नवनियुक्त संचालक रवी शास्त्रीवर आली आहे. माङया नियुक्तीमुळे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचे महत्त्व कमी झालेले नाही, अशी प्रतिक्रिया शास्त्रीने व्यक्त केली.
इंग्लंडविरुद्ध पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताने मालिका 3-1 ने गमाविली. त्यानंतर शास्त्री याच्याकडे संघाचे संचालकपद सोपविण्यात आले. शास्त्री म्हणाला, ‘माङो कार्य सर्व बाबींवर लक्ष ठेवणो आहे. सर्व मला रिपोर्ट करतील. इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेर्पयत माङयाकडे ही जबाबदारी राहणार आहे. माङया नियुक्तीमुळे फ्लेचर यांचे महत्त्व कमी होणार नाही. ते मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहतील. संजय बांगर व भरत अरुण सहायक प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळतील.’
संघासाठी काही करायची इच्छा असल्यामुळे मी ही जबाबदारी स्वीकारली, असेही शास्त्री म्हणाला.
शास्त्री पुढे म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटसाठी हा महत्त्वाचा कालावधी आहे. मला पद स्वीकारण्याबाबत विचारणा झाली. त्यानंतर मी विचार केला व होकार कळविला. भारतीय क्रिकेटसाठी योगदान देण्याची माझी तयारी आहे. काम कठीण आहे किंवा सोपे आहे, याचा मी कधीच विचार करीत नाही. योगदान देणो महत्त्वाचे आहे. मी आज जे काही आहे ते केवळ बीसीसीआयमुळे. ज्युनिअर पातळीवर बीसीसीआयने राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर देशाचे प्रतिनिधित्व करता आले.’ संचालकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर फ्लेचर किंवा कर्णधार धोनीसोबत चर्चा झाली का? याबाबत बोलताना शास्त्री म्हणाला, ‘मंगळवारी त्यांच्यासोबत दोन तास चर्चा झाली. ’ (वृत्तसंस्था)