फ्लेचर, शास्त्री मजबूत टीम बनवतील : द्रविड
By Admin | Updated: August 24, 2014 01:01 IST2014-08-24T01:01:04+5:302014-08-24T01:01:04+5:30
माजी कर्णधार रवी शास्त्री आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ मजबूत बनेल, असा विश्वास भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड याने व्यक्त केला आह़े

फ्लेचर, शास्त्री मजबूत टीम बनवतील : द्रविड
नवी दिल्ली : माजी कर्णधार रवी शास्त्री आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ मजबूत बनेल, असा विश्वास भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड याने व्यक्त केला आह़े
इंग्लंड दौ:यातील कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या संचालकपदी निवड केली आह़े
द्रविड म्हणाला, ‘‘शास्त्री यांची भारतीय संघाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे ते प्रशिक्षक फ्लेचरसोबत संघ मजबूत करण्यासाठी विशेष मेहनत घेतील, यात शंका नाही.’’ डंकन फ्लेचर उत्कृष्ट प्रशिक्षक आहेत़ यापूर्वी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे; मात्र इंग्लंड दौ:यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला उत्कृष्ट कामगिरी करता आली नाही, याची खंत आहे; मात्र आता रवी शास्त्री संघासोबत जोडल्यामुळे नक्कीच संघाच्या कामगिरीत सुधारणा होईल, अशी आशा आह़े
इंग्लंड दौ:यात भारताला मात खावी लागल्यामुळे गोलंदाजी प्रशिक्षक जो डावेस आणि
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेव्हर पॅनी
यांची सुट्टी करण्यात आली़
आता भारताचा माजी खेळाडू संजय बांगर, माजी वेगवान गोलंदाज भारत अरुण आणि आऱ श्रीधर यांची सह प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आह़े
याबद्दल द्रविड म्हणाला, ‘‘इंग्लंड दौ:याच्या मध्येच सपोर्ट स्टाफ बदलणो योग्य नाही़ कारण खेळाडूंच्या सपोर्ट स्टाफसोबत चांगला ताळमेळ
बसलेला असतो़ अचानक
त्यांच्या जागी दुस:या व्यक्तींची निवड झाल्यास त्यांच्यात ताळमेळ बसविणो थोडे कठीण होत़े (वृत्तसंस्था)