फ्लेचर अँड कंपनी गाशा गुंडाळणार?

By Admin | Updated: August 20, 2014 00:40 IST2014-08-20T00:40:43+5:302014-08-20T00:40:43+5:30

इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी रवी शाी यांची संचालकपदी नेमणूक ही प्रशिक्षक डंकन फ्लेचर अॅण्ड कंपनीला नियंत्रणात ठेवण्याची चाल आहे.

Fletcher and company will bounce? | फ्लेचर अँड कंपनी गाशा गुंडाळणार?

फ्लेचर अँड कंपनी गाशा गुंडाळणार?

शास्त्रींना सर्वाधिकार :  संजय बांगर, भरत अरूण, आर. श्रीधर मदतनीस
मुंबई  : काही कौतुक करीत आहेत, तर काही टीका. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) हा निर्णय दूरगामी नाही, तर सोयीचा आहे. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी रवी शाी यांची संचालकपदी नेमणूक ही प्रशिक्षक डंकन फ्लेचर अॅण्ड कंपनीला नियंत्रणात ठेवण्याची चाल आहे. याकामी रवी शाी यांना माजी अष्टपैलू संजय बांगर, माजी मध्यमगती गोलंदाज भरत अरुण आणि आर. श्रीधर मदत करणार आहे.
बीसीसीआयकडून अधिकृत निर्णय आला नसला तरी फ्लेचर यांचे भवितव्य गटांगळ्य़ा खाऊ लागले असून, भारतातील वेस्ट इंडिज दौ:यात फ्लेचर आणि कंपनी नसेल, असे संकेत मिळत आहेत. डंकन फ्लेचर यांच्याकडे आता काहीही अधिकार राहिलेले नाहीत. रवी शाी हे सव्रेसर्वा बनले आहेत. याची कल्पना फ्लेचर यांनाही आली आहे. त्यामुळे फ्लेचर यांना ‘बॅक सीटवर’च जाणो क्रमप्राप्त आहे. फ्लेचर यांना वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी प्रशिक्षकपद सोडायचे असल्यास बीसीसीआय त्यांना रोखणार नाही, असे एका कार्यकारिणी सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
फ्लेचर यांनी सोडचिठ्ठी देण्याबाबत काही सांगितले काय, असे विचारले असता बीसीसाआयने त्यांना सूचक ‘फिलर्स’ पाठविले आहेत. धोरण ठरवताना रवी शाी आणि धोनी यांचा सहभाग असेल.  बांगर यांचा नवीन खेळाडूंशी चांगला परिचय आहे. सध्याचे नवीन गोलंदाज भरत अरुण यांच्या हाताखाली ‘एनसीए’त तयार झाले आहेत. एवढे सगळे झाल्यानंतर फ्लेचर यांच्या हातात काही राहिले नसून त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठीच हे सर्व चालले आहे. त्यांनी तो दिला तर लगेच स्वीकारला जाईल, असेही या सदस्याने सांगितले. 
इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू चॅम्पियन लीग टी-2क् सामने खेळण्यासाठी त्यांच्या संघात दाखल होतील. वेस्ट इंडिजविरुद्धचा दौरा 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्याआधी डंकन फ्लेचर 
सुट्टीवर गेलेले असतील. फ्लेचर यांचा करार 2क्15 च्या विश्वचषकार्पयत असला तरीही त्यांचे बाहेर पडण्याचे एक उपकलम करारात आहे. त्यामुळे त्यांना सहज बाहेर पडता येईल. प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड यांचे नाव  विचारार्थ असले तरी तो फारसा उत्सुक नाही. (विशेष प्रतिनिधी)
 
शाींच्या नियुक्तीला गावसकरांचा पाठिंबा
भारताचे माजी कर्णधार तसेच प्रसिद्ध समालोचक सुनील गावस्कर यांनी धोनीचेच नव्हे, तर रवी शाी यांच्या नियुक्तीला पाठिंबा दर्शविला आहे. धोनीने संघाला एक आदर्श घालून दिला आहे. कठीणप्रसंगी वेगवेगल्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याचे अनुकरण संघसहकारी करणार नसतील तर कर्णधारावर त्याचा दोष कसा देता येईल? सध्या तरी धोनीला पर्याय नाही, असे गावस्कर यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले. 
 
संजय बांगर यांना 12 कसोटी आणि 15 वन डे खेळण्याचा अनुभव असून, प्रतिभावान कोच म्हणून त्यांची गणना होते. त्यांनी यंदा किंग्स पंजाबला आयपीएलची अंतिम फेरी गाठून दिली होती. 
 
हैदराबादचे माजी रणजी खेळाडू आर. श्रीधर हे 19 वर्षाखालील भारतीय संघाचे क्षेत्ररक्षणातील कोच होते. आयपीएलमध्ये त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबचे क्षेत्ररक्षण कोच म्हणून भूमिका बजावली आहे.
 
भारत अरुण हे 198क् च्या दशकात दोन  कसोटी आणि चार वन डे खेळले. कपिलदेव यांच्यासोबत त्यांनी गोलंदाजी केली; पण त्यांना अधिक यश मिळू शकले नाही. ते सात वर्षापासून एनसीएत गोलंदाजी कोच आहेत. 2क्12 साली ऑस्ट्रेलियात 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे ते  कोच होते.

 

Web Title: Fletcher and company will bounce?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.