पाकला प्रतीक्षा पहिल्या विजयाची
By Admin | Updated: March 1, 2015 01:13 IST2015-03-01T01:13:47+5:302015-03-01T01:13:47+5:30
मैदानात आणि बाहेर वादग्रस्त ठरलेल्या पाकिस्तान संघाला ‘ब’ गटात रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवून विजयी पथावर येण्याचे आव्हान असेल.

पाकला प्रतीक्षा पहिल्या विजयाची
ब्रिस्बेन : मैदानात आणि बाहेर वादग्रस्त ठरलेल्या पाकिस्तान संघाला ‘ब’ गटात रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवून विजयी पथावर येण्याचे आव्हान असेल.
१९९२चा चॅम्पियन पाकला पहिल्या दोन्ही सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजकडून एकतर्फी पराभवास सामोरे जावे लागल्याने सात संघांच्या गटात पाक संघ अखेरच्या स्थानावर आहे. झिम्बाब्वेने एक विजय मिळविला पण दोन पराभव झाल्याने हा संघ पाचव्या स्थानावर आहे. पराभवानंतर संघात जे वाद उद्भवले त्यामुळे पाक संघ निराश आहे. कर्णधार मिस्बाह उल हक आणि त्याच्या संघावर कमकुवत कामगिरीमुळे सातत्याने टीकेचा भडिमार होत असल्याने या अवस्थेत उर्वरित साखळी सामन्यात संघ कशी कामगिरी करतो, हे पहावे लागेल.