..अखेर मनोजला मिळाला न्याय!

By Admin | Updated: November 27, 2014 00:49 IST2014-11-27T00:49:15+5:302014-11-27T00:49:15+5:30

अनेक दिवस चाललेली कायदेशीर प्रक्रिया व प्रचंड विरोधानंतर अखेर भारतीय बॉक्सर मनोजकुमारला ‘अजरुन पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आह़े

Finally Manoj got justice! | ..अखेर मनोजला मिळाला न्याय!

..अखेर मनोजला मिळाला न्याय!

नवी दिल्ली : अनेक दिवस चाललेली कायदेशीर प्रक्रिया व प्रचंड विरोधानंतर अखेर भारतीय बॉक्सर मनोजकुमारला ‘अजरुन पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आह़े बुधवारी केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार मनोजला प्रदान करण्यात आला़
2क्14च्या अजरुन पुस्कार मिळविणा:या खेळाडूंच्या यादीत स्थान न मिळाल्यामुळे मनोजने न्यायालयात दाद मागितली होती़ न्यायालयाने त्याच्या बाजूने निकाल दिल्यामुळे त्याला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला़ मनोजने 2क्1क्च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि 2क्13च्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरले आह़े तो म्हणाला, ‘‘माङो काम बॉक्सिंग करणो हेच आहे आणि मी तेच केल़े मी या पुरस्काराचा हक्कदार होतो़;मात्र माङयाकडे दुर्लक्ष करण्यात आले होत़े 
 
कपिलवर केली टीका
न्यायालयीन लढाई जिंकल्यामुळे ‘अजरुन पुरकस्कार’ मिळविणा:या मनोजकुमारने या पुरस्कारासाठी समर्थन न देणारे कपिलदेव यांच्यावर टीका केली आह़े  मनोज म्हणाला, ‘‘आपले म्हणणो मांडण्यासाठी कपिल यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला़ तेव्हा त्यांनी मला ओळखलेसुद्धा नाही़

 

Web Title: Finally Manoj got justice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.