नदाल-जोकोव्हिचे यांच्यात ‘फायनल’

By Admin | Updated: May 19, 2014 04:30 IST2014-05-19T04:21:03+5:302014-05-19T04:30:40+5:30

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असेलला स्पेनचा राफेल नदाल आणि दुसर्‍या स्थानावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यादरम्यान रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे.

'Final' between Nadal and Djokovic | नदाल-जोकोव्हिचे यांच्यात ‘फायनल’

नदाल-जोकोव्हिचे यांच्यात ‘फायनल’

रोम : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असेलला स्पेनचा राफेल नदाल आणि दुसर्‍या स्थानावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यादरम्यान रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. अव्वल मानांकित नदालने उपांत्य फेरीत १२ व्या मानांकित बुल्गारियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हचा ६-२, ६-२ ने धुव्वा उडविला, तर जोकोव्हिचने दुसर्‍या उपांत्य लढतीत आठव्या मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिकवर ६-७, ७-६, ६-३ ने संघर्षपूर्ण विजय मिळविला. राओनिकविरुद्ध विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावला असल्याचे जोकोव्हिचने म्हटले आहे. अंतिम लढतीसह फ्रेंच ओपन आाणि मोसमातील उर्वरित स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असल्याचे सांगणार्‍या जोकोव्हिचला रोम मास्टर्स स्पर्धेत तिसरे विजेतेपद पटकाविण्याची संधी आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 'Final' between Nadal and Djokovic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.