संघर्ष करणे माझ्या रक्तात, नेमारने शेअर केला पायाचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 06:03 IST2022-11-28T06:02:45+5:302022-11-28T06:03:17+5:30

सुजलेल्या पायाचा फोटो नेमारने इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे.

Fighting is in my blood, Neymar shared a photo of his feet | संघर्ष करणे माझ्या रक्तात, नेमारने शेअर केला पायाचा फोटो

संघर्ष करणे माझ्या रक्तात, नेमारने शेअर केला पायाचा फोटो

दोहा : फुटबॉल विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात ब्राझीलने सर्बियाचा २-० ने पराभव केला. मात्र यादरम्यान त्यांचा प्रमुख खेळाडू नेमार जखमी झाला. उजव्या पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागणार आहे. पण या दुखापतीतून तो झपाट्याने सावरतो आहे.

सुजलेल्या पायाचा फोटो नेमारने इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे. त्याखाली त्याने लिहिले की, हो सध्या मी दुखापतग्रस्त असून मला प्रचंड वेदना होत आहेत. शरीरापेक्षा मानसिक वेदना या जास्त मोठ्या असतात. सध्या मी आयुष्याच्या सर्वात कठीण काळाला सामोरे जात आहे. पण मला विश्वास आहे की यातून मी लवकरच सावरून पुन्हा संघासोबत मैदानावर दिसेल. माझा देश आणि सहकाऱ्यांसाठी मी शर्थीचे प्रयत्न करण्यास तयार आहे. कारण माझ्या जीवनात कुठलीच गोष्ट मला सहज मिळाली नाही. त्यामुळे संघर्ष करणे हे माझ्या रक्तातच आहे. त्याच्या या पोस्टनंंतर अनेक चाहत्यांनी नेमारसाठी देवाकडे साकडे घातले आहे.

Web Title: Fighting is in my blood, Neymar shared a photo of his feet