क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा सत्कार
By Admin | Updated: August 25, 2014 23:48 IST2014-08-25T23:48:44+5:302014-08-25T23:48:44+5:30
औरंगाबाद : मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे़ हा सत्कार सोहळा विभागीय क्रीडा संकुल येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे़

क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा सत्कार
औ ंगाबाद : मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे़ हा सत्कार सोहळा विभागीय क्रीडा संकुल येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे़ २०१३-१४ मधील शैक्षणिक वर्षात शालेय, तसेच संघटनेद्वारे आयोजित विविध खेळांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभागी, तसेच प्राविण्य मिळविणार्या खेळाडूंनी आपला बायोडाटा आणि खेळांच्या प्रमाणपत्रांच्या झेरॉक्ससह जिल्हा क्रीडा कार्यालय, आमखास मैदान येथे २७ ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे आणि कार्यक्रम प्रमुख एऩएम़ धंदर यांनी केले आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)