कोतोलीत चालक-वाहकांचा सत्कार

By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:06+5:302014-12-02T00:36:06+5:30

तीन तोळ्यांचे गंठण, १३ हजारांचा मोबाईल व रोकड वाहकाने केली परत

Felicitated Kotolit Driver-Carrier | कोतोलीत चालक-वाहकांचा सत्कार

कोतोलीत चालक-वाहकांचा सत्कार

ल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित नीलराजे पंडित बावडेकर यांच्यावतीने प्रायोजित श्रीमंत भैयासाहेब बावडेकर-पंत अमात्य बावडेकर यांच्या स्मरणार्थ १५ वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत माईसाहेब बावडेकर हायस्कूलने महावीर इंग्लिश स्कूलचा ९१ धावांनी पराभव केला. या विजयात बावडेकर हायस्कूलच्या क्षितीज पाटीलने १२० धावांची सवार्ेत्तम खेळी केली.
शाहू स्टेडियम येथे आज, सोमवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बावडेकर हायस्कूलने २९ षटकांत ५ बाद १६७ धावा केल्या. त्यामध्ये क्षितीज पाटीलने नाबाद १२० धावा केल्या तर तेजस जोशीने २३ धावा केल्या. गोलंदाजी करताना महावीर इंग्लिश स्कूलकडून तन्मय कालेकरने ३, तर मोहित पटेल व ओंकार मांगलेकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. अवांतर १९ धावा दिल्या.
उत्तरादाखल खेळताना महावीर इंग्लिश स्कूलने २३ षटकांत सर्वबाद ७६ धावा केल्या. त्यामध्ये गुरुप्रसाद चव्हाणने नाबाद २५, यश बारापत्रेने ९ धावा केल्या. गोलंदाजी करताना माईसाहेब बावडेकर हायस्कूलच्या राज यादवने ४, तर क्षितीज पाटील याने २ आणि तेजस जोशी, प्रथमेश पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
---------------------
फोटो : ०११२२०१४-कोल- क्षितीज पाटील

Web Title: Felicitated Kotolit Driver-Carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.