गुडघ्याच्या जखमेमुळे फेडरर वर्षभरासाठी बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 03:08 IST2020-06-11T03:07:51+5:302020-06-11T03:08:22+5:30
३८ वर्षांच्या या खेळाडूने बुधवारी टिष्ट्वटवर ही माहिती देताच त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली.

गुडघ्याच्या जखमेमुळे फेडरर वर्षभरासाठी बाहेर
लंडन : स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू, २० ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी रॉजर फेडरर याच्या गुडघ्याच्या जखमेवर शस्त्रक्रिया झाली आहे. तो २०२० चे सत्र खेळणार नसून पुढच्या वर्षी थेट कोर्टवर दाखल होईल. ३८ वर्षांच्या या खेळाडूने बुधवारी टिष्ट्वटवर ही माहिती देताच त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली. फेब्रुवारीत फेडररच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. ती अयशस्वी ठरल्याने आता पुन्हा शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. २०२१च्या सुरुवातीला मैदानावर परतण्याचा फेडररने निर्णय घेतला आहे.