शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

क्रीडासंहितेचे पालन केल्याशिवाय महासंघांना अस्थायी मान्यता नाहीच - दिल्ली उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 1:58 AM

जोपर्यंत क्रीडा महासंघ संहितेचे पालन करीत नाही तोपर्यंत आम्ही आस्थायी मान्यता प्रदान करण्याची परवानगी देणार नाही. महासंघांनी स्वत:ची व्यवस्था सुधारावी,’असे न्या. हिमा कोहली आणि न्या. नजमी वजीरी यांच्या पीठाने म्हटले आहे

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी क्रीडासंहितेचे पालन केले किंवा नाही हे जाणून घेतल्याखेरीज अस्थायी मान्यता प्रदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही,असे दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.

पीठाने अ‍ॅड. राहुल मेहरा यांना नोटीस बजावताना २०१० मध्ये त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तीन आठवड्यात म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. विविध क्रीडा संस्थांच्या चौकशीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. मेहरा यांच्याच याचिकेवर न्यायालयाने आधी महासंघांना क्रीडासंहिता पालन करणे बंधनकारक असल्याचा आदेश दिला. ५७ पैकी नेमके किती महासंघ संहितेचे पालन करीत आहेत,हे जाणून घेण्याचा मेहरा यांनी प्रयत्न केला होता.

मंत्रालयातर्फे अतिरिक्त महाधिवक्ता चेतन शर्मा आणि केंद्र शासनाचे वकील अनिल सोनी यांनी पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिकच्या तयारीसाठी महासंघांना अस्थायी मान्यता प्रदान करण्याचे अंतरिम आदेश द्यावेत,अशी पीठाकडे विनंती केली. पीठाने मात्र दुसरी बाजू जाणून घेतल्याशिवाय असा आदेश देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यंदा जानेवारीत मान्यता प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू केली तेव्हा तुम्ही आमच्याकडे आला नव्हता. आता तात्काळ अंतरिम आदेश देण्याची विनंती करू शकत नाही,असेही न्यायालयाने नमूद केले.उच्च न्यायालयाने २४ जून रोजी दिलेल्या आदेशात क्रीडा मंत्रालयाच्या २ जून रोजीच्या मान्यता प्रदान करण्याच्या निर्णयावर जैसे थे स्थितीचा आदेश दिला होता. मंत्रालयाने पत्रक काढून न्यायालयाच्या ७ फेब्रुवारीच्या आदेशाचे उल्लंघन केले,त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेतली नाही,असे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. पुढील सुनावणी ७ आॅगस्ट रोजी होणार आहे.‘जोपर्यंत क्रीडा महासंघ संहितेचे पालन करीत नाही तोपर्यंत आम्ही आस्थायी मान्यता प्रदान करण्याची परवानगी देणार नाही. महासंघांनी स्वत:ची व्यवस्था सुधारावी,’असे न्या. हिमा कोहली आणि न्या. नजमी वजीरी यांच्या पीठाने म्हटले आहे. ५७ राष्ट्रीय क्रीडा महासंघांना अस्थायी मान्यता देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने केलेल्या विनंती अर्जावर ही सुनावणी झाली. पुढील वर्षीच्या ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना सरावाची व्यवस्था करता यावी यासाठी मान्यता देणे गरजेचे असल्याचे मंत्रालयाने विनंती अर्जात म्हटले आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय