राहुल त्रिपाठीचा धमाका, पुण्याने घरच्या मैदानावर कोलकाताला लोळवलं
By Admin | Updated: May 3, 2017 23:44 IST2017-05-03T23:41:59+5:302017-05-03T23:44:33+5:30
राहुल त्रिपाठीने फटकावलेल्या 52 चेंडूत 93 धावांच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला.

राहुल त्रिपाठीचा धमाका, पुण्याने घरच्या मैदानावर कोलकाताला लोळवलं
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 3 - राहुल त्रिपाठीने फटकावलेल्या 52 चेंडूत 93 धावांच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला. 156 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत पुण्याने कोलकाताला त्यांच्या घरच्या मैदानावरच लोळवलं. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताला 8 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 155 धावांपर्यंतच मजल मारता आली होती.