अनुभवामुळे आत्मविश्वास उंचावला

By Admin | Updated: July 8, 2014 01:52 IST2014-07-08T01:52:17+5:302014-07-08T01:52:17+5:30

परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याची क्षमता कर्णधार महेंद्रसिंग धोनीची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

Experience boosts self confidence | अनुभवामुळे आत्मविश्वास उंचावला

अनुभवामुळे आत्मविश्वास उंचावला

नॉटिंघम : परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याची क्षमता कर्णधार महेंद्रसिंग धोनीची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. गेल्या सात वर्षात आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला यशाच्या शिखरावर पोहोचविणारा धोनी म्हणाला की, अनुभवामुळे आत्मविश्वास उंचावला. धोनीने 33व्या वाढदिवशी ‘बीसीसीआय.टीव्ही’सोबत संवाद साधला. 2क्क्7 टी-2क् विश्वचषक स्पर्धेपूर्वी कर्णधारपदी नियुक्ती, सीनिअर खेळाडूंच्या उपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणो आणि कर्णधारपदाची शैली याबाबत त्याने सखोल चर्चा केली.
भारताला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान, 2क्11 मध्ये विश्वविजेतेपद, 2क्क्7 टी-2क् विश्व चॅम्पियन आणि गेल्या वर्षी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद याबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘अनुभव महत्त्वाचा ठरतो. मी योजना आखत नाही आणि आत्म्याच्या आवाजावर विश्वास ठेवतो. अंतरात्म्याच्या ध्वनीची अनुभूती घेण्यासाठी अनुभव असणो गरजेचे आहे.’ 
याबाबत स्पष्ट करताना धोनी म्हणाला, ‘तुम्हाला बाईकबाबत विशेष माहिती नाही. मी एखाद्या बाईकचे इंजिन उघडून तुमच्या पुढय़ात ठेवले आणि तुम्हाला हे इंजिन कुठल्या बाईकचे आहे, असा प्रश्न केला. त्यावेळी तुम्हाला तुमचे मन काहीच सांगू शकणार नाही; कारण त्या वस्तूबाबत तुम्हाला काहीच माहिती नाही.’
इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 9 जुलैपासून नॉटिंघममध्ये प्रारंभ होणार आहे. ही मालिका म्हणजे धोनीच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण परीक्षा असल्याचे मानले जात आहे. (वृत्तसंस्था)
 
4सीनिअर खेळाडूंच्या बाबतीत एक बाब प्रामुख्याने सांगता येईल. अनुभव असल्यामुळे मला सांगण्यासाठी त्यांच्याकडे अनेक योजना असायच्या आणि वेळोवेळी त्यांच्याकडून योग्य सल्लाही मिळत होता.
4‘सीनिअर खेळाडूंच्या उपस्थितीचे दडपण कधीच जाणवले नाही.  त्यांच्यासोबत थेट संवाद साधता येत होता आणि ते नाराजही होत नव्हते. त्यामुळे मला यश मिळविता आले. मी माङया शैलीने कर्णधारपदाचे गुण विकसित केले.

 

Web Title: Experience boosts self confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.