इक्वाडोरचे आव्हान संपुष्टात

By Admin | Updated: June 27, 2014 01:49 IST2014-06-27T01:49:05+5:302014-06-27T01:49:05+5:30

दहा खेळाडूंसह खेळणा:या इक्वाडोर संघाने विश्वकप फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स संघाला क्-क् ने बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला

Exhausted Ecuador's Challenge | इक्वाडोरचे आव्हान संपुष्टात

इक्वाडोरचे आव्हान संपुष्टात

>रियो दी जानेरियो : दहा खेळाडूंसह खेळणा:या इक्वाडोर संघाने विश्वकप फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स संघाला क्-क् ने बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला खरा; पण बाद फेरी गाठण्यात त्यांना अखेर अपयशच आले. फ्रान्स संघाने ‘ई’ गटात अव्वल स्थान पटकावत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. प्री क्वॉर्टर फायनलमध्ये फ्रान्स संघाला नायजेरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. विश्वकप स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलेला इक्वाडोर पहिला दक्षिण अमेरिकन संघ ठरला. या गटातील अन्य सामन्यात स्वित्ङरलडने होंडुरासचा 3-क् ने पराभव करीत दुसरे स्थान पटकाविले. 
नशिबाची साथ, प्रतिस्पर्धी संघाचा सुमार खेळ आणि अलेक्ङॉन्डर डोमिनग्वेजचे शानदार गोलरक्षण यांच्या जोरावर इक्वाडोर संघाने दुस:या हाफमध्ये कर्णधार एंटिनियो वेलेंसियाविना खेळतानाही फ्रान्सला बरोबरीत रोखण्याची कामगिरी केली. लुकास डिगAेला पायाने मारल्यामुळे व्हेलेंसियाला मैदानाबाहेर जावे लागले. सामन्याचा निकाल फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिएर डेसचॅम्प्स यांच्यासाठी निराशाजनक आहे. 7 गुणांसह गटात अव्वल स्थान पटकाविणारा फ्रान्स संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला. 
या लढतीसाठी डेसचॅम्प्स यांनी संघात 6 बदल केले; पण नायजेरियाविरुद्धच्या लढतीत मात्र यातील अनेक खेळाडू संघात पुनरागमन करतील, अशी आशा आहे. होंडुरास व स्वित्ङरलडविरुद्धच्या विजयात 3 गोल नोंदविणारा करीम बेनजेमा याला संघात स्थान मिळाले; पण फ्रान्सला मथियू वालबुएना व योहान कबाये यांची उणीव भासली. कबायेला निलंबनामुळे या लढतीत खेळता आले नाही. त्याच्या स्थानी साउथम्पटनच्या मोर्गन स्नेडर्लिनला संधी मिळाली. 
सामन्याच्या पहिल्या सत्रत फ्रान्स संघाने चमकदार खेळ केला; पण प्रतिस्पर्धी संघाचा गोलकिपर डोनिमग्वेजचा अडसर दूर करण्यात त्यांना अपयश आले. डोनिमग्वेजने 15व्या मिनिटाला मोसा सिसोकाचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर एंटोनी ग्रीजमॅनच्या फ्री किकवर पॉल पोग्बाचा हेडरही थोपविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.  (वृत्तसंस्था)

Web Title: Exhausted Ecuador's Challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.