Ex-F1 chief Bernie Ecclestone to become father for fourth time at age of 89 svg | बाप रे बाप... फॉर्म्युला वनचा माजी बॉस 89 वर्षी बनला बाप; पत्नी आहे वयानं लहान

बाप रे बाप... फॉर्म्युला वनचा माजी बॉस 89 वर्षी बनला बाप; पत्नी आहे वयानं लहान

जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असताना सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. पण, फॉर्म्युला वन शर्यतीचे माजी प्रमुख बर्नी एस्लेस्टन यांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. एस्लेस्टन हे वयाच्या 89व्या वर्षी बाप बनणार आहे. त्यांची पत्नी फॅबिआना फ्लोसी हिचं वय हे बर्नींपेक्षा निम्मे आहे. या जोडप्याला जुलै महिन्यात बाळ होणार आहे, अशी माहिती बर्नी यांनी डेली मेल या वेबसाईटला दिली.

'' येथे असामान्य असं काही नाही. मागील काही काळ माझ्याकडे काम नव्हतं आणि त्यामुळे सराव करण्यासाठी माझ्याकडे बराच वेळ होता. मला 89 आणि 29 या वयातील फरक जाणवला नाही,'' असे बर्नी यांनी सांगितले. बर्नी यांची पत्नी 44 वर्षांची आहे आणि ती मार्केटींग एक्झेक्युटीव आहे. तिच्याबद्दल बर्नी म्हणाले,''मी खुप खुश आहे आणि विशेषतः माझ्या पत्नीसाठी. माझ्यापेक्षा तिला झालेला आनंद शब्दात सांगणे कठीण आहे.'' 

बर्नी यांचं हे चौथं बाळ असणार आहे आणि नवा पाहुणा येणार असल्यानं मुलीलाही आनंद झाल्याचे बर्नी यांनी सांगितले. 

Read in English

Web Title: Ex-F1 chief Bernie Ecclestone to become father for fourth time at age of 89 svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.