लोढा समितीच्या निर्णयावर समितीची स्थापना

By Admin | Updated: July 19, 2015 22:17 IST2015-07-19T22:17:22+5:302015-07-19T22:17:22+5:30

आयपीएल फिक्सिंग प्रकरणामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीने दोन वर्षांची बंदी लादली.

Establishment of Committee on Lodha Committee's decision | लोढा समितीच्या निर्णयावर समितीची स्थापना

लोढा समितीच्या निर्णयावर समितीची स्थापना

मुंबई : आयपीएल फिक्सिंग प्रकरणामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीने दोन वर्षांची बंदी लादली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बैठकीमध्ये या निर्णयावर अभ्यास करून त्याचा सहा आठवड्यांमध्ये तपशील देण्यासाठी एक आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, चेन्नई आणि राजस्थान या दोन संघांविषयी बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना या वेळी मंडळाने केवळ समिती स्थापून तूर्तास या संघाबाबतचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.
मुंबईमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पूर्णपणे पालन करण्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी न्यायालयाच्या निर्णयावर काम करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या समितीतील सदस्यांची नावे सोमवारी घोषित करण्यात येतील, असेही सांगितले. सुमारे तासभर झालेल्या या बैठकीनंतर बीसीसीआयने स्पष्ट केले, की लोढा समितीच्या निर्णयाचा आम्ही आदर करून त्यांनी दिलेल्या निर्णयाचे लगेच पालन करू. देशामध्ये खेळाची प्रतिमा उंचावण्यासाठी व ती कायम राखण्यासाठी मंडळातील सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे.

आयपीएल - ९ आणखी भव्य व शानदार
माझ्यावर विश्वास दाखवून समिती स्थापन करण्याची जबाबदारी सोपविली आहे. सहा आठवड्यांच्या कालावधीमध्ये आम्ही आमचा अहवाल सादर करून आयपीएल यापुढे कसे सुरू ठेवले जाईल, यावर निर्णय घेतला जाईल. या समितीतील सदस्यांचे नावे सोमवारी जाहीर केली जातील. या वेळी सर्व हितचिंतकांनी आपले विचार मांडले व आयपीएल सुरू राहण्याबाबत एकमत केले. आयपीएलचे ९ वे सत्र आणखी भव्य व शानदार असेल, याची मी खात्री देतो.
- राजीव शुक्ला, आयपीएल अध्यक्ष

Web Title: Establishment of Committee on Lodha Committee's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.