सिद्धांतची स्वत:च्या विक्रमाशी बरोबरी

By Admin | Updated: August 20, 2014 00:38 IST2014-08-20T00:38:42+5:302014-08-20T00:38:42+5:30

अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 11क् मीटर अडथळ्याच्या शर्यतीत 13.65 सेकंदांची वेळ नोंदवून स्वत:च्याच विक्रमाची बरोबरी केली.

Equivalent to the theory of their own record | सिद्धांतची स्वत:च्या विक्रमाशी बरोबरी

सिद्धांतची स्वत:च्या विक्रमाशी बरोबरी

पतियाळा :  ओएनजीसीकडून खेळत असलेल्या महाराष्ट्राच्या सिद्धांत थिंगालियाने फेडरेशन चषक वरिष्ठ गट मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 11क् मीटर अडथळ्याच्या शर्यतीत 13.65 सेकंदांची वेळ नोंदवून स्वत:च्याच विक्रमाची बरोबरी केली. सिद्धांतने या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकताना इंचियोन येथे होणा:या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. 
पतियाळा येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्सच्या (एनआयएस) मैदानावर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमवीर सिद्धांतने सुरुवातीपासून निर्विवाद वर्चस्व राखले. प्रथम क्रमांक जिंकताना सिद्धांतने 2क्12मध्ये ब्रुसेल्स येथील बेल्जियम नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये दुस:या क्रमांकावर राहताना 13.65 सेकंदांची वेळ नोंदविली होती. त्याने चार वर्षापूर्वी पतियाळा येथेच 13.81 सेकंदांत शर्यत पूर्ण करून  पहिला विक्रम नोंदविला होता. या शर्यतीत तेलंगाच्या प्रेम कुमारला (13.96 से.), तर तमिळनाडूच्या के. सुरेंद्रला (14.24 से.) अनुक्रमे दुस:या व तिस:या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राचा अनिष जोशीला (14.45 से.) पाचव्या क्रमांकावर राहिला.  पुरुषांच्या दहा हजार मीटर  महाराष्ट्राच्या राहू कुमार पालने 3क् मी. क्4.77 सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. तमिळनाडूचा लक्ष्मण दुस:या व राजस्थानचा खेता राम तिस:या क्रमांकावर 
राहिला. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Equivalent to the theory of their own record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.