भारत दौ-यात इंग्लंडचा ‘व्हाईटवॉश’ होईल : वॉन
By Admin | Updated: October 26, 2016 19:53 IST2016-10-26T19:53:55+5:302016-10-26T19:53:55+5:30
अॅलिस्टर कूकच्या नेतृत्वाखालील सध्याच्या इंग्लंड संघात भारत दौ-यात कसोटी मालिकेत ५-० व्हाईटवॉश होईल, असे भाकित माजी कर्णधार मायकेल वॉन याने केले आहे.

भारत दौ-यात इंग्लंडचा ‘व्हाईटवॉश’ होईल : वॉन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - : अॅलिस्टर कूकच्या नेतृत्वाखालील सध्याच्या इंग्लंड संघात भारत दौ-यात कसोटी मालिकेत ५-० व्हाईटवॉश होईल, असे भाकित माजी कर्णधार मायकेल वॉन याने केले आहे. बांगलादेश दौ-यात पहिल्या कसोटीत इंग्लंडने अवघ्या २२ धावांनी विजय नोंदविला होता. संघाच्या विजयावर मात्र अनेक माजी खेळाडूंनी निराशा व्यक्त केली. वॉन म्हणाला,‘इंग्लंडने बांगलादेशविरुद्ध ज्या पद्धतीने कामगिरी केली तसाच खेळ भारताविरुद्ध झाल्यास आमच्या संघाचा ‘व्हाईटवॉश’ ठरला आहे.’
बीबीसीशी बोलताना वॉन पुढे म्हणाला, ‘बांगलादेशविरुद्ध संघाची कामगिरी मुळीच चांगली नव्हती. अनेकदा त्यांनी तीन गड्यांच्या मोबदल्यात ३०-४० धावा केल्या. भारत दौºयात असेच घडत राहिले तर सफाया ठरलेला आहे. बांगलादेशवर विजय नोंदविल्याचे संघाला समाधान वाटत असेल, पण यापेक्षा चांगली कामगिरी करता आली असती याची खंत अधिक आहे.’ चितगाव येथे पहिल्या कसोटीत बांगला देशला विजयासाठी ३३ धावांची गरज होती. पण बेन स्टोक्सने अखेरचे दोन गडी बाद करीत इंग्लंडला विजय मिळवून दिला. उभय संघात दुसरी कसोटी ढाका येथे शुक्रवारपासून सुरू होत आहे.
(वृत्तसंस्था)