सरावात इंग्लंडचा निघाला घामटा

By Admin | Updated: June 6, 2014 09:20 IST2014-06-06T00:53:28+5:302014-06-06T09:20:53+5:30

फुटबॉल वल्र्डकप पूर्वी आपली क्षमता आजमावण्यासाठी येथे सुरू असलेल्या सराव सामन्यात इंग्लंडचा घामटा निघाला.

England went on tour | सरावात इंग्लंडचा निघाला घामटा

सरावात इंग्लंडचा निघाला घामटा

>इक्वेडरविरुद्ध बरोबरीत समाधान : इतर लढतीत हॉलंड, उरुग्वे यांनी विजय साजरे केले
ब्राझील : फुटबॉल वल्र्डकप पूर्वी आपली क्षमता आजमावण्यासाठी येथे सुरू असलेल्या सराव सामन्यात इंग्लंडचा घामटा निघाला. तुलनेने दुबळ्या इक्वेडर संघाविरुद्ध त्यांना 2-2 अशा बरोबरीत समाधान मानावे लागल्याने पुढील वाटचालीसाठी त्यांना आणखी मेहनत घेण्याचे संकेत मिळाले आहेत. इतर लढतीत गत उपविजेते हॉलंड आणि उरुग्वे यांनी आपापले सामने सहज जिंकले. 
सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने हल्लाबोल करून 2-क् अशी मजबूत आघाडी घेत चाहत्यांना खुश केले. 29 व्या मिनिटाला वॅन रुनीने आणि 51व्या मिनिटाला रिकी लँमबर्ट यांनी गोल करून इक्वेडरला जबरदस्त धक्का दिला. पण, या धक्क्यातूनही स्वत:ला सावरत इक्वेडरने केलेल्या जबरदस्त हल्ल्यात इंग्लंडचा घामटा निघाला. मायकल अरोयो आणि एनेर वैलेंसिया यांच्या प्रत्येक एका गोलने सामना 2-2 असा बरोबरीत आणला. 
 
4इक्वेडरच्या या हल्ल्याने गांगरलेल्या इंग्लंडला काय करावे हेच सुचत नव्हेत. त्यांचा प्रत्येक वार हा चोख पद्धतीने परतवला जात होता. सामन्याच्या शेवटच्या क्षणी याची घुसमट बाहेर निघाली आणि 79 व्या मिनिटाला या दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये झालेल्या हाणामारीचा प्रकार सर्वानी अनुभवला. 
 
4इक्वेडरचा खेळाडू अॅटोनिओ वेलेन्सीआ याच्याकडून चेंडू हिसकावण्याच्या नादात रहिम स्टर्लिगने त्याच्या पायात कैची घातली. याने रागावलेल्या वेलेन्सीआने स्टर्लिगवर हात उगारला आणि क्षणात वातावरण तापले. पंचांनी या दोघांनाही रेड कार्ड दाखवून बाहेरचा रस्ता दाखवला. या तणाव परिस्थितीनंतर सामना सुरू झाला आणि बरोबरीत संपला.
 
32 व्या मिनिटाला अर्जेन रॉबेन याने केलेल्या गोलच्या बळावर हॉलंडने वेल्सविरुद्धच्या लढतीत 1-क् अशी आघाडी घेतली आणि 79व्या मिनिटात जर्मन लेंस याने दुसरा गोल करून हॉलंडच्या विजयावर 2-क् असे शिक्कामोर्तब केले.
 
02 गोल्सच्या फरकाने गतवर्षी उपांत्य फेरीत प्रवेश करणा:या उरुग्वेने स्लोवेनियाचा पराभव केला. उरुग्वेकडून स्ट्रायकर एडिन्सन कवानी आणि क्रिस्टीयन स्टुआनी यांनी प्रत्येकी एक गोल करून 2-क् असा विजय निश्चित केला. 
 
यजमानांना तिसरे स्थान
4नुकत्याच जाहीर झालेल्या फुटबॉल मानांकनानुसार यजमान ब्राझील संघाला फुटबॉल वल्र्डकपमध्ये तिस:या स्थानावरुन सुरुवात करावी लागणार आहे. स्पेन आणि जर्मनी यांनी आपले अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान आबाधित राखले असून ब्राझीलने एक स्थानाची झेप घेत पोतरुगालला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले आहे. 
4अर्जेटिंना आणि स्वीत्ङरलड संघांनी दोन स्थानांची झेप घेत अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान काबीज केले आहे. इंग्लंडनेही एक स्थानाची झेप घेत दहावे स्थान पटकावले. ग्रीसला मात्र दोन स्थान खाली जावे लागले असून ते 12व्या स्थानावर फेकले गेले आहेत.
 
इटलीची कसोटी
4चार वेळा वल्र्डकप जिंकणा:या इटलीवर बरोबरीत समाधान मानण्याची नामुष्की ओढावली. लक्जेमबर्ग विरुद्ध त्यांना 1-1 अशा बरोबरीत सामना सोडवावा लागला. क्लोडिया मारचिसियो याने सामन्याच्या 9व्या मिनिटाला गोल करून लक्जेमबर्गला आघाडी मिळवून दिली होती. 
 
4सामना संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना मॅक्सिम चॅनोटने हेडरद्धारे अप्रतिम गोल करून इटलीची लाज वाचवली आणि त्यांना 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली.  गेल्या नऊ आंतरराष्ट्रीय लढतीत लक्जेमबर्गची इटलीविरुद्धचा सर्वात यशस्वी कामगिरी आहे. इतर लढतीत अल्जेरियाने 
2-1 अशा फरकाने रोमानियाचा पराभव केला, तर चिलीने 2-क् अशा फरकाने आर्यलडवर विजय साजरा केला. अल्जेरियाकडून नॅबिल बेंटालेब आणि अल अरबी सुडानी यांनी प्रत्येकी एक गोल केला. आयवरी कोस्टाने डिडियर ड्रोग्बाच्या दोन गोलच्या बळावर अल सल्वाडोरचा पराभव केला. 
 
नेयमारसाठी 
विजयच सर्व काही
ब्राझीलची ओळख फुटबॉलने होत असली तरी नेयमारसाठी विजयच सर्व काही आहे. घरच्या मैदानावर ब्राझीलला सहावे वल्र्डकप जेतेपद पटकावून देण्याचा मानस त्याने व्यक्त केला.

Web Title: England went on tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.