शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कसोटी संघापेक्षा हा इंग्लंड संघ वेगळा...

By admin | Updated: January 15, 2017 04:27 IST

गेल्या महिन्यात कसोटी मालिकेत सहज विजय मिळवला त्याप्रमाणे वन-डे मालिकाही सहज जिंकता येईल, असा विचार जर यजमान संघ करीत असेल तर त्यांच्यावर आश्चर्यचकित होण्याची

- सुनील गावसकर लिहितो...गेल्या महिन्यात कसोटी मालिकेत सहज विजय मिळवला त्याप्रमाणे वन-डे मालिकाही सहज जिंकता येईल, असा विचार जर यजमान संघ करीत असेल तर त्यांच्यावर आश्चर्यचकित होण्याची वेळ येऊ शकते. २०१५ च्या वन-डे विश्वकप स्पर्धेत साखळी फेरीत गारद होणाऱ्या संघाच्या तुलनेत हा इंग्लंड संघ फार वेगळा आहे. इंग्लंड संघामध्ये त्यानंतर झपाट्याने सुधारणा झाली. त्याचे श्रेय इयोन मॉर्गनला द्यायलाच हवे. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघात कमालीचा बदल झाला. मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघात जसा बदल घडला तसाच बदल मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंड संघात झालेला दिसून येत आहे. संघातील या बदलाचे श्रेय कर्णधाराला मिळायलाच हवे. विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर इंग्लंड संघाने ब्रँडन मॅक्युलमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाविरुद्ध पहिली मालिका खेळली होती. त्या मालिकेत त्यांनी न्यूझीलंड संघाच्या शैलीचा कित्ता गिरवण्याचा प्रयत्न केला. त्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. त्यांनी केवळ न्यूझीलंड संघाचा पराभवच केला असे नाही तर मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलागही केला. सुरुवातीच्या काळात मोठ्या लक्ष्यापुढे इंग्लंड संघ ढेपाळत होता. मॉर्गनच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड संघामध्ये कमालीचा बदल झाला. प्रतिकूल परिस्थितीत इंग्लंड संघ केवळ विजय मिळविण्यात यशस्वी ठरत आहे असे नाही तर ते चाहत्यांचे मनोरंजन करण्यातही यशस्वी ठरत आहेत. या मालिकेत काय घडते, हे दिसेलच, पण जून महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ च्या आयसीसी विश्वकप स्पर्धेत इंग्लंड संघाने विजेतेपद पटकावले नाही तर काहीतरी गंभीर चूक झाली असल्याचे स्पष्ट होईल. गेल्या मोसमात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी असलेल्या खेळपट्ट्यांप्रमाणे या मालिकेतही खेळपट्ट्या असतील तर भारतीय गोलंदाजांसाठी ही मालिका खडतर राहील. खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असतील तर अश्विन व जडेजाच्या उपस्थितीत भारतीय संघाला संधी राहील. दोन सराव सामन्यांत भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यात चांगला असल्याचे निदर्शनास आले आहे. (पीएमजी)