इंग्लंड-नॉव्रे मैत्रीपूर्ण लढत
By Admin | Updated: September 4, 2014 01:29 IST2014-09-04T01:29:36+5:302014-09-04T01:29:36+5:30
युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरी सुरु होण्या अगोदर जागतिक क्रमवारीत आपल्यापेक्षा कमकुवत असणा:या नॉव्रेशी आज इंग्लिश फुटबॉल संघाची आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढत वेम्बली स्टेडियमवर होत आहे.

इंग्लंड-नॉव्रे मैत्रीपूर्ण लढत
केदार लेले - लंडन
युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरी सुरु होण्या अगोदर जागतिक क्रमवारीत आपल्यापेक्षा कमकुवत असणा:या नॉव्रेशी आज इंग्लिश फुटबॉल संघाची आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढत वेम्बली स्टेडियमवर होत आहे. वेम्बली स्टेडीयमवर होणा:या या लढतीत सुमारे 35-4क् हाजर प्रेक्षक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या मैत्रीपूर्ण लढतीमुळे इंग्लंड आणि नॉव्रे हे संघ तब्बल 2क् वर्षानंतर आमचे-सामने येत आहेत.
विश्वचषक स्पर्धेत इंग्लंउला यंदा गटसाखळीचा अडथळा सुद्धा पार करता आला नव्हता. अनुक्रमे इटली आणि उरुग्वेकडून त्यांना 2-1 ने पराभव सहन करावा लागला होता तर कोस्टारिका विरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली होती. इंग्लंडची विश्वचषक स्पर्धेतील ही सर्वात खराब कामगिरी आहे.
युरो चषक पात्रता फेरीच्या हंगामाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. नॉव्रेविरुद्ध बुधवारी होणा:या मैत्रीपूर्ण लढती नंतर युरोपियन चषक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंडचा सामना स्वित्ङरलड विरुद्ध होईल. नवोदित इंग्लंड संघात 5 खेळाडूंचे सरासरी वय 22 आहे. रुनीला सध्या मॅन्चेस्टर युनायटेड संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. तसेच त्याला नवोदित इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत
पात्र होण्यासाठी इंग्लंड संघ कसून सराव करीत आहे. विश्वचषक स्पर्धेतील अपयश पचवून इंग्लंडचे फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक रॉय हॉजसन युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी बदल आणत कशी भरारी घेतात याच्याकडे संपूर्ण इंग्लंडचे लक्ष्य आहे.