इंग्लंड गोड शेवट करण्यास उत्सुक
By Admin | Updated: June 24, 2014 01:19 IST2014-06-24T01:19:07+5:302014-06-24T01:19:07+5:30
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ड गटात मंगळवारी इंग्लंड आणि कोस्टा रिका आमने सामने येणार आहेत़

इंग्लंड गोड शेवट करण्यास उत्सुक
>बेलो होरिजोंटे : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ड गटात मंगळवारी इंग्लंड आणि कोस्टा रिका आमने सामने येणार आहेत़ कोस्टारिकाने बाद फेरीत प्रवेश मिळविल्यामुळे हा संघ विजयी अभियान कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल, तर इंग्लंड संघ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाल्यामुळे गोड शेवट करण्यासाठी प्रयत्नशील असेल़
जबदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कोस्टारिका संघाने आपल्या गत दोन सामन्यांत उरुग्वे आणि इटली या संघांवर शानदार विजय मिळवून बाद फेरीचे तिकीट पक्के केले आह़े दोन विजयामुळे या संघाच्या खात्यात 6 गुण आहेत,तर सलग दोन पराभवामुळे इंग्लंडचे बाद फेरीचे स्वप्न धुळीस मिळाले आह़े त्यामुळे आता साखळी फेरीत आपल्या अखेरच्या लढतीत विजय मिळवून सन्मानाने स्पर्धेचा निरोप घेण्यास इंग्लंड संघ प्रयत्नशील असेल़ कोस्टारिकाने आपल्या पहिल्या लढतीत उरु ग्वेला 3-1 अशी धूळ चारली होती, तर दुस:या सामन्यांत त्यांनी अनुभवी इटली संघावर 1-क् ने मात करीत बाद फेरीत प्रवेश केला़ त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या लढतीत कोस्टारिका संघ स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी इच्छुक असेल़
दुसरीकडे इंग्लंडला गत दोन सामन्यांत उरुग्वे आणि इटली यांच्याकडून पराभवाची नामुष्की ओढावली होती़ 1958 नंतर पहिल्यांदाच इंग्लंड संघावर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची वेळ आली आह़े त्यामुळे हा संघ स्पर्धेतील अखेरच्या लढतीत सवरेत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न करेल़ (वृत्तसंस्था)
इंग्लंडच्या ल्यूकला संधी मिळणार ?
4बेलो होरिजोंटे : कोस्टारिकाविरुद्धच्या लढतीत इंग्लंड संघात 18 वर्षीय लेफ्ट बॅक ल्यूक शॉ ला संधी मिळू शकत़े या व्यतिरिक्त मिडफिल्डर रॉस बर्कले आणि दुखापतीनंर पुनरागमन करणारा विंगर अॅलेक्स चेंबरलेन यांच्याकडून विशेष कामगिरीची अपेक्षा आह़े