शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडला स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल

By admin | Updated: February 9, 2015 03:58 IST

विश्वकप स्पर्धेसाठी दाखल झालेला इंग्लंड संघ कामगिरीच्या तुलनेत अधिक सक्षम भासत आहे. या संघात प्रत्येक क्रमांकावर दर्जेदार खेळाडूंचा समावेश आहे

विश्वकप स्पर्धेसाठी दाखल झालेला इंग्लंड संघ कामगिरीच्या तुलनेत अधिक सक्षम भासत आहे. या संघात प्रत्येक क्रमांकावर दर्जेदार खेळाडूंचा समावेश आहे, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येते, हे धक्कादायक आहे. त्यामुळे या बाबीवर लक्ष द्यावे लागेल. या विश्वकप स्पर्धेत गोलंदाज वर्चस्व गाजवतील, असे मानले जात असले तरी इंग्लंडकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नव्या चेंडूचा वापर करणाऱ्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक गोलंदाज आहे. जेम्स अ‍ॅन्डरसनसारखा गोलंदाज आपल्या संघात असावा, असे प्रत्येक संघाला वाटते. त्याची साथ देण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड व स्टीव्हन फिन सज्ज आहेत. आॅस्ट्रेलियाविरुद्धची त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्याचप्रमाणे ख्रिस व्होक्ससारखा फलंदाजी व गोलंदाजीमध्ये उपयुक्त योगदान देण्यास सक्षम असलेला खेळाडू इंग्लंड संघात आहे. मोईन अली व जोस बटलर यांच्या समावेशामुळे इंग्लंड संघाचा समतोल साधल्या गेला आहे. मोईन अलीला सलामीवीर म्हणून छाप सोडण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, पण प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्याची त्याच्या गोलंदाजीमध्ये क्षमता आहे. त्याचप्रमाणे बटलरला अव्वल सहामध्ये स्थान मिळायला हवे. कारण, सातव्या क्रमांकावर त्याच्या क्षमतेला योग्य न्याय मिळत नाही. तो सामना जिंकून देणारा खेळाडू असून इंग्लंडला ही बाब समजणे आवश्यक आहे. प्रतिभावान खेळाडूंचा समावेश असला तरी इंग्लंडला जेतेपदाचा दावेदार मानल्या जात नाही. त्याची अनेक कारणे आहेत. त्यांचे खेळाडू लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतात. या क्रमवारीत सर्वांत वरचा क्रमांक आहे तो इयान बेलचा. जवळजवळ १५० वन-डे सामने खेळण्याचा अनुभव असला तरी बेलला संघातील स्थान निश्चित करता आलेले नाही. स्टीव्हन फिन व इयोन मॉर्गन बाबतही असेच म्हणता येईल. आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंनी मॅच विनर म्हणून ओळख निर्माण करणे आवश्यक होते. मॉर्गन फिनिशरची भूमिका बजावित आहे. अन्य खेळाडूंच्या साथीने मॉर्गनने संघाला विजय मिळवून देण्याची भूमिका बजाविणे गरजेचे आहे. तिरंगी मालिकेत आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली त्यावेळी त्याची ही क्षमता दिसून आली. फिनच्या उंचीचा विचार करता तो अ‍ॅन्डरसनच्या साथीने आघाडीचा गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, पण त्याचा वापर उशिरा करण्यात येतो. इंग्लंडचा संघ विश्वकप स्पर्धेत धोकादायक संघ ठरू शकतो, असा मला विश्वास आहे, पण इंग्लंड संघाला स्वत:वर विश्वास आहे किंवा नाही, याची कल्पना नाही. (टीसीएम)