इंग्लंड-कोस्टा रिका लढत बरोबरीत
By Admin | Updated: June 25, 2014 02:16 IST2014-06-25T02:16:47+5:302014-06-25T02:16:47+5:30
फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी इंग्लंड आणि कोस्टारिया यांच्यादरम्यान ‘ड’ गटात खेळल्या गेलेली लढत गोलशून्यने बरोबरीत संपली.

इंग्लंड-कोस्टा रिका लढत बरोबरीत
>बेलो होरिझोंटे : फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी इंग्लंड आणि कोस्टारिया यांच्यादरम्यान ‘ड’ गटात खेळल्या गेलेली लढत गोलशून्यने बरोबरीत संपली. कोस्टारिकाने या लढतीपूर्वीच बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला होता तर सलग दोन पराभव स्वीकारणा:या इंग्लंड संघ बाद फेरीच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर फेकल्या गेला होता. या गटात कोस्टारिकासह उरुग्वे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला. कोस्टारिकाने साखळी फेरीत उरुग्वे व इटली संघांचा पराभव करण्याची कामगिरी केली. या लढतीत विजय मिळवित स्पर्धेत शेवट गोल करण्याची इंग्लंडला संधी होती, पण त्यांना अखेर अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले.