इंग्लंडला नमवत श्रीलंकेचा मालिका विजय

By Admin | Updated: December 14, 2014 01:16 IST2014-12-14T01:16:22+5:302014-12-14T01:16:22+5:30

माजी कर्णधार कुमार संगकाराने (112) वन-डे क्रिकेट कारकिर्दीतील झळकाविलेल्या 2क्व्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने शनिवारी झालेल्या सहाव्या लढतीत इंग्लंडचा 90 धावांनी पराभव केला.

England beat Sri Lanka series win | इंग्लंडला नमवत श्रीलंकेचा मालिका विजय

इंग्लंडला नमवत श्रीलंकेचा मालिका विजय

पल्लेकल : माजी कर्णधार कुमार संगकाराने (112) वन-डे क्रिकेट कारकिर्दीतील झळकाविलेल्या 2क्व्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने शनिवारी झालेल्या सहाव्या लढतीत इंग्लंडचा 90 धावांनी पराभव केला. या सात सामन्यांच्या मालिकेत 4-2 अशी विजयी आघाडी मिळविली.
संगकाराच्या (112 धावा, 112 चेंडू, 12 चौकार, 2 षटकार) शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित 5क् षटकांत 7 बाद 292 धावांची दमदार मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणा:या इंग्लंडचा डाव 41.3 षटकांत 2क्2 धावांत गुंडाळला. 
श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने (5) झटपट माघारी परतल्यानंतर संगकाराने तिलकरत्ने दिलशानच्या साथीने दुस:या विकेटसाठी 153 धावांची भागीदारी केली. तर संघाच्या 243 धावा असताना संगकारा बाद झाला. श्रीलंकेच्या डावात थिसारा परेरा (16) व जीवन मेंडिस (नाबाद 12) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. इंग्लंडतर्फे स्टिव्हन फिन, ािस व्होक्स व ािस जॉर्डन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. 
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार अॅलिस्टर कुक (1) पहिल्या षटकातील तिस:याच चेंडूवर बाद झाला. जेरोम टेलर (1क्) व मोईन अली (34) यांना मोठी खेळी करता आली नाही. जो रुटने एकाकी झुंज देताना 55 धावा फटकाविल्या.  श्रीलंकेतर्फे सुरंगा लकमलने 8 षटकांत 4 बळी घेतले. लकमलने रुट (55), रवी बोपारा (13), इयोन मॉर्गन (क्) आणि ािस जॉर्डन (4) यांना तंबूचा मार्ग दाखविला. (वृत्तसंस्था)

 

Web Title: England beat Sri Lanka series win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.