इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली

By Admin | Updated: August 31, 2016 10:31 IST2016-08-31T08:58:31+5:302016-08-31T10:31:18+5:30

डने काल पाकिस्तान विरुद्ध नॉटिंगहॅम येथे झालेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करुन ४४४ धावांचा नवा विश्वविक्रम नोंदवला.

England beat Pakistan by playing in the rug | इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली

इंग्लंडने रियाझ करुन पाकिस्तानची वाजवली - नेटीझन्सनी उडवली खिल्ली

ऑनलाइन लोकमत 

टेंटब्रीज, दि. ३१ - इंग्लंडने काल पाकिस्तान विरुद्ध नॉटिंगहॅम येथे झालेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करुन ४४४ धावांचा नवा विश्वविक्रम नोंदवला. पाकिस्तानचा भेदक गोलंदाज वाहाब रियाझची इंग्लिश फलंदाजांनी अक्षरक्ष: पिसे काढली. 
 
भारतीय क्रिकेटपटूंनीही पाकिस्तानच्या या कामगिरीची टि्वटरवरुन चांगलीच फिरकी घेतली. इंग्लंडवाले रियाझ करुन करुन पाकिस्तानची वाजवत आहेत असे टि्वट भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने केले. वाहाब रियाझने १० षटकात ११० धावा मोजल्या. नेटीझन्सनीही पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. 
 
आणखी वाचा 
कसोटीमध्ये अव्वल क्रमांकावर आल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा रडीचा डाव
 
एकदिवसीय सामन्यात वाहाब रियाझने त्याचे शतक पूर्ण केले असे टि्वट जाडेजाने केले. इंग्लंडने पाकिस्तानी संघाच्या मानवी हक्काच उल्लंघन केल्याबद्दल पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आयसीसीला पत्र पाठवलं आहे  अस टि्वट एकाने केलं. 
 
 

Web Title: England beat Pakistan by playing in the rug