सायनाचे आव्हान संपुष्टात

By Admin | Updated: June 20, 2014 23:57 IST2014-06-20T23:57:01+5:302014-06-20T23:57:01+5:30

भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालला इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक विजेती चीनची जुईरई लीकडून पराभव पत्करावा लागला.

Ending the challenge of science | सायनाचे आव्हान संपुष्टात

सायनाचे आव्हान संपुष्टात

>जकार्ता : भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालला इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक विजेती चीनची जुईरई लीकडून पराभव पत्करावा लागला. 
या स्पर्धेत तीन वेळा विजेतेपद जिंकलेल्या सायनाला चुरशीच्या झालेल्या लढतीत जागतिक क्रमवारी नंबर वन असलेल्या जुईरईची भिंत भेदता आली नाही. सायनाला 44 मिनिटांत 2क्-22, 15-21 असा पराभवाचा सामना करावा लागला.  अटीतटीच्या झालेल्या पहिल्या गेममध्ये सायना प्रत्येक गुणांसाठी झगडत होती. तिने 2क्-2क् गुणांर्पयत बरोबरी साधली होती; पण नंतर ती जुईरईला रोखू शकली नाही. पहिली गेम गमावल्यानंतर सायनाला जुईरईने दुस:या गेममध्ये कोणतीही संधी दिली नाही. तिने दुसरी गेम 21-15 अशी जिंकली आणि उपांत्य फेरीतील  जागा निश्चित केली. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Ending the challenge of science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.