शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: September 12, 2015 03:25 IST

जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या आठव्या मानांकित पारुपल्ली कश्यप याला सहाव्या मानांकित चिनी तैपेईच्या च्यू तिएन चेन याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.

तोक्यो : जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या आठव्या मानांकित पारुपल्ली कश्यप याला सहाव्या मानांकित चिनी तैपेईच्या च्यू तिएन चेन याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. कश्यपला चेन याने २१-१४, २१-१८ असा सरळसेटमध्ये सहज पराभूत करीत स्पर्धेच्या बाहेर काढले. कश्यप व चेन या पूर्वी तीन वेळा समोरा समोर आले आहेत. त्यात कश्यपने दोन वेळा बाजी मारली आहे. या स्पर्धेत कश्यपला लय साधता आली नाही. चेन याना जोरदार सुरुवात करीत लागोपाठ पाच गुण मिळवित कश्यपला जोरदार धक्का दिला. त्यानंतर कश्यपने पुनरागमन करीत काहीप्रमाणात प्रतिआक्रमण केले. एकवेळ ८-८ अशी बरोबरी देखील होती. मात्र चेनने पुन्हा आघाडी घेत कश्यपला संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये कश्यपने टक्कर देत ४-२ अशी आघाडी मिळविली. मात्र तो चेन याच्यावर दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरला. चेनने पुन्हा ८-४ अशी आघाडी घेतली. एकवेळ कश्यप १८-२० असा पिछाडीवर होता. मात्र तेन याने १ अंक मिळवित दुसऱ्या सेटसह सामना खिशात घातला. या पराभवामुळे भारताचे या २ लाख ७५ हजार डॉलर पुरस्काराच्या स्पर्र्धेतील आव्हानदेखील संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत कश्यप उपांत्यपूर्व फेरीत जाणारा एकमेव भारतीय खेळाडू होता. भारताची फुलराणी साईना नेहवाल दुसऱ्या फेरीतच स्पर्धेच्या बाहेर पडली होती. तसेच पी. व्ही. संधू, भारताची दुहेरीतील प्रसिद्ध जोडी ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा, अजय जयराम, प्रदन्या गादरे, एन. सिक्की रेड्डी यांना देखील या स्पर्धेत आपला प्रभाव पाडता आला नाही. (वृत्तसंस्था)मीज आज क्षमतेनुसार खेळ केला नाही. अनेकदा मी चुकीचे फटके मारले. तसेच काही प्रसंगात मी घेतलेले निर्णय देखील चुकीचे होते. त्याचा फटका मला बसला. दुसऱ्या फेरीत पुनरागमनासाठी मी जोरदार प्रयत्न केले. त्यात काहीप्रमाणात यशही मिळाले. मात्र तोपर्यंत सामना हातातून गेला होता. च्यू तिएन चेन याने या सामन्याच सुरेख खेळ केला. - पारुपल्ली कश्यप, बॅडमिंटनपटू