व्हीनसचे आव्हान संपुष्टात; केर्बर अंतिम फेरीत
By Admin | Updated: July 8, 2016 00:51 IST2016-07-08T00:51:27+5:302016-07-08T00:51:27+5:30
दिग्गज आणि अनुभवी टेनिसस्टार अमेरिकेच्या व्हीनस विलियम्सचे विम्बल्डनमधील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. जर्मनीच्या एंजलिका केर्बरने सहजपणे बाजी मारताना

व्हीनसचे आव्हान संपुष्टात; केर्बर अंतिम फेरीत
लंडन : दिग्गज आणि अनुभवी टेनिसस्टार अमेरिकेच्या व्हीनस विलियम्सचे विम्बल्डनमधील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. जर्मनीच्या एंजलिका केर्बरने सहजपणे बाजी मारताना आपल्याहून अनुभवी असलेल्या व्हीनसला ६-४, ६-४ असा धक्का दिला. अंतिम फेरीत केर्बरला बलाढ्य सेरेना विलियम्सविरुध्द दोन हात करायचे आहेत.
विशेष म्हणजे याआधी यावर्षाच्या सुरुवातीलाच केर्बरने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम पटकावताना सेरेनाला नमवून आॅस्टे्रलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. सेरेनाला आता या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी मिळाली आहे.