एलिट गट फुटबॉल स्पर्धा
By Admin | Updated: June 21, 2014 00:15 IST2014-06-21T00:15:36+5:302014-06-21T00:15:36+5:30

एलिट गट फुटबॉल स्पर्धा
>यंग मुस्लिम क्लबचा यंग इक्बालवर ३-१ ने विजयएलिट गट फुटबॉल स्पर्धा नागपूर: यंदाच्या मोसमात विजयी घोडदौड करणाऱ्या यंग मुस्लिम संघाने गतउपविजेता यंग इक्बाल संघाचा शुक्रवारी एलिट गट फुटबॉल स्पर्धेच्या साखळीत ३-१ ने पराभव केला. मेघे ग्रूप प्रायोजित ही स्पर्धा नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेने दपूम रेल्वेच्या मोतीबाग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.यंग मुस्लिम संघाचा हा दुसरा विजय ठरला. आधीच्या सामन्यात त्यांनी दपूम रेल्वेचा पराभव केला तर शहर पोलीस संघाविरुद्ध सामना बरोबरीत सोडविला होता. मध्यंतरापर्यंत यंग मुस्लिम १-० ने पुढे होता. शाहबाज पठाण याने हा गोल नोंदविला.यानंतर यंग इक्बालच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण यंग मुस्लिमच्या बचावफळीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले.उत्तरार्धातील खेळात शोएब रिझवान याने ४९ व्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी दुपट्ट केली. यंग मुस्लिमचा तिसरा गोल नावेद अख्तर याने ७२ व्या मिनिटाला नोंदविला. चार मिनिटानंतर मोहम्मद इक्बाल याने यंग इक्बालकडून गोल नोंदवित पराभवाचे अंतर कमी केले. सामन्यात नियमबाह्य खेळ केल्याबद्दल यंग मुस्लिमचा इम्रान खान याला रेफ्रीने ९० व्या मिनिटाला तंबी दिली. उद्या शनिवारी रब्बानी क्लब आणि रेंज पोलीस संघ यांच्यात दुपारी ३.४५ पासून सामना खेळला जाईल. (वृत्तसंस्था)