शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

दुती चंदला सुवर्णपदक, ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत १०० मीटरमध्ये यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 5:40 AM

भारताची सर्वांत वेगवान महिला धावपटू दुती चंदने शनिवारी येथे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाचा मान मिळवला.

भुवनेश्वर : भारताची सर्वांत वेगवान महिला धावपटू दुती चंदने शनिवारी येथे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाचा मान मिळवला.दुतीची ही वर्षातील पहिली शर्यत आहे. २४ वर्षीय ही धावपटू आपल्या कलिंग इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधित्व करीत आहे. तिने ११.४९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण करीत अव्वल स्थान पटकावले. मेंगलोर विद्यापीठाच्या धनलक्ष्मी एस हिने ११.९९ सेकंद वेळेसह दुसरे तर महात्मा गांधी विद्यापीठीची स्नेहा एसएस हिने १२.०८ सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.गेल्या वर्षी राष्ट्रीय ओपन अ‍ॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ११.२२ सेकंद वेळेसह आपल्या राष्ट्रीय विक्रमात सुधारणा करणाऱ्या दुतीला टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्यासाठी ११.१५ सेकंदाची वेळ नोंदवणे आवश्यक आहे. ती २०० मीटर स्पर्धेत सहभागी होणार आहे. दुती म्हणाली, ‘माझा सराव चांगला सुरू आहे. मी रोज सहा ते सात तास सराव करीत आहे.>खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव शानदार आहे. मी सुवर्णपदकही पटकावले. मी निकालामुळे खूश आहे. २०२० मधील ही माझी पहिली शर्यत आहे. त्यामुळे वर्षाची सुरुवात शानदार झाली. मी पुढील स्पर्धेत वेळेमध्ये १० ते १५ सेकंदाने सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहील. मी फिट असून, मला वेगामध्ये सुधारणा करावी लागेल.- दुती चंद

टॅग्स :Dutee Chandद्युती चंद