शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्यंत चौहानसाठी हवा ठरली ‘शापित’

By admin | Updated: September 25, 2014 03:38 IST

आशियाई स्पर्धेतील बुधवारचा दिवस हा भारताचा रोविंगपटू दुष्यंत चौहान याच्यासाठी ‘शापित’ ठरला.

इंचियोन : आशियाई स्पर्धेतील बुधवारचा दिवस हा भारताचा रोविंगपटू दुष्यंत चौहान याच्यासाठी ‘शापित’ ठरला. पुरुषांच्या लाइट वेट एकेरी स्कल प्रकारात दुष्यंतचे सुवर्णपदक जवळपास निश्चित होते, परंतु अचानक हवेने दिशा बदलली आणि हाताशी आलेले सुवर्ण त्याच्याकडून निसटले. सामन्याच्या सुरुवातीपासून दुष्यंतचा वेग हा हवेला आणि पाण्याचा चिरत आघाडीकडे जात होता. हरियाणाच्या या खेळाडूने स्पर्धेत २,००० मीटरपर्यंत आघाडी घेतली होती, परंतु अचानक वातावरणात आलेल्या बदलामुळे आणि रिमझिम पावसाने त्याची लय बिघडली. २,००० मीटरपर्यंत आघाडीवर असूनही त्याला ७ मिनिटे २६:५७ सेकंदांची वेळ नोंदवून कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तो म्हणाला, मला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र बदललेल्या हवेने माझ्या मार्गात अडथळा निर्माण केला आणि त्यामुळे मी पिछाडीवर गेलो. तरीही कांस्य पटकावता आले याचे समाधान आहे.सुवर्णपदक विजता लो क्वान हाइ याच्याहून दुष्यंत ५०० मीटर पिछाडीवर होता, परंतु त्याने आपली गती वाढवत बरोबरी साधली आणि नंतर आघाडी मिळवली. ती २,००० मीटरपर्यंत कायम राखत सुवर्णपदकाच्या अगदी तो जवळ पोहोचला होता. त्याला केवळ सुवर्णने नाही तर रौप्यनेही हुलकावणी दिल्याने कांस्यवर समाधान मानावे लागले. यजमानांचा ली हॉकबियोम याने ७ मिनिटे २५:९५ सेकंदांची वेळ नोंदवून रौप्य पटकावले. नेमबाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर आजच्या दिवसाचे हे भारताचे पहिले पदक ठरले. दुष्यंतच्या कांस्यपदकावर रोविंग फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव एम़ व्ही़ श्रीराम यांनीही खंत व्यक्त केली. ते म्हणाले, की संपूर्ण स्पर्धेत तो आघाडीवर होता आणि तो सुवर्ण जिंकू शकला असता.