ऑलिम्पिकमध्ये सामन्या दरम्यान खिशातून पडला मोबाईल
By Admin | Updated: August 11, 2016 17:31 IST2016-08-11T17:20:56+5:302016-08-11T17:31:45+5:30
आज मोबाईल अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कोणीही मोबाईलशिवाय फारवेळ राहू शकत नाही.

ऑलिम्पिकमध्ये सामन्या दरम्यान खिशातून पडला मोबाईल
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ११ - आज मोबाईल अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कोणीही मोबाईलशिवाय फारवेळ राहू शकत नाही. मात्र मोबाईल कुठे जवळ बाळगावा याचेही भान असले पाहिजे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सामना सुरु असताना कोणी मोबाईल जवळ बाळगेल का ?.
फ्रान्सचा तलवारपटू एन्झो लेफर्ट मात्र याला अपवाद आहे. चक्क ऑलिम्पिकचा सामना सुरु असताना एन्झोच्या खिशात मोबाईल होता. जर्मनीच्या पीटर जॉपीच विरुद्ध तलवारबाजीचा सामना सुरु असताना एका क्षणाला एन्झोच्या मागच्या खिशात असलेला हा मोबाईल जमिनीवर पडला. त्यामुळे एन्झोची चांगलीच फजिती झाली.
एन्झोने लगेच तो मोबाईल उचलला व समोर बसलेल्या प्रेक्षकाच्या हातात दिला. रविवारी कॅरीओका एरीना येथे पात्रता फेरीचा सामना सुरु असताना ही घटना घडली. एन्झोने जॉपीच विरुद्धचा हा सामना दोन गुणांच्या फरकाने गमावला.