DUBAI OPEN TENNIS : बोपन्ना - माटकोव्हस्की उपांत्य फेरीत
By Admin | Updated: March 2, 2017 16:53 IST2017-03-02T16:53:20+5:302017-03-02T16:53:20+5:30
भारताचा रोहन बोपन्ना आणि पोलंडचा त्याचा जोडीदार मार्गिन माटकोव्हस्की यांनी दुबई ड्युटी फ्री खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष गटात दुहेरीची उपांत्य फेरी गाठली.

DUBAI OPEN TENNIS : बोपन्ना - माटकोव्हस्की उपांत्य फेरीत
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 02 - भारताचा रोहन बोपन्ना आणि पोलंडचा त्याचा जोडीदार मार्गिन माटकोव्हस्की यांनी दुबई ड्युटी फ्री खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष गटात दुहेरीची उपांत्य फेरी गाठली.
बोपन्ना-माटकोव्हस्की या बिगर मानांकित जोडीने हार्डकोर्ट स्पर्धेत उपांत्यपूर्व लढतीत रोमानियाचा फफ्लोरिन मार्जिया आणि सर्बियाचा व्हिक्टर ट्रोइस्की यांच्यावर ६-३, ६-४ ने विजय साजरा केला. बोपन्नाची या मोसमातील ही दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. सुरुवातीला त्याने सहकारी जीवन नेदुचेझियनसोबत चेन्नई ओपनचे जेतेपद पटकविले होते.
बोपन्ना-मोटकोव्हस्की यांनी पहिल्या फेरीत इव्हान डोडिंग-मार्सेल ग्रॅनोलर्स यांच्यावर ५-७, ६-३, ११-९ ने विजय नोंदविला होता. उपांत्य झेरीत बोपन्ना-मोटकोव्हस्की यांची लढतलियांडर पेसस-गुलेर्मो लोपेझ यांच्याविरुद्ध होईल. त्याआधी पेस-लोपेझ यांना उपांत्यपूर्व फेरीत कॅनडाचा डॅनियल नेस्टर आणि स्पेनचा त्याचा साथीदार एडुआर्ड व्हेसलिन यांच्याविरुद्ध दोन हात करावे लागतील. एकेरीत एकही भारतीय शिल्लक नाही.