तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत चिकलठाण हायस्कूलचे दुहेरी यश
By Admin | Updated: September 2, 2014 19:36 IST2014-09-02T19:36:06+5:302014-09-02T19:36:06+5:30
कन्नड : तालुक्यातील चिकलठाण जि. प. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉल खेळात दुहेरी यश मिळविले.

तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत चिकलठाण हायस्कूलचे दुहेरी यश
क ्नड : तालुक्यातील चिकलठाण जि. प. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉल खेळात दुहेरी यश मिळविले.१४ वर्षे वयोगटात अनिल चव्हाण, अनिल बोरसे, किरण पुरी, किरण मगर, सचिन बोरसे, अजिंक्य पुरी या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला, तर १७ वर्षे वयोगटातील कल्याणी चव्हाण, मंदा ढोके, प्रियंका चव्हाण, अश्विनी जट्टे, सरिता बोलकर, अनिता खरात या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्षे वयोगटातील विशाल दांडेकर, अल्ताफ शहा, प्रवीण चव्हाण, प्रवीण बोरसे, आकाश अधाने, विशाल म्हस्के हा मुलांचा संघ उपविजेता ठरला. या संघांना प्रकाश जायभाये यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल मुख्याध्यापक रामेश्वर राठोड यांच्यासह शिक्षकांनी विजयी संघाचे कौतुक केले.फोटो कॅप्शन :- विजयी संघासमवेत मुख्याध्यापक रामेश्वर राठोड, प्रकाश जायभाये, रजनीकांत भदाणे, राठोड आदी.